उद्घाटनांपेक्षा विद्यार्थ्यांची सुटका होणं गरजेचं, शरद पवारांचा PM मोदींना जोरदार टोला
पुणे: रशिया आणि युक्रेन युद्धामुळे भारतातील हजारो विद्यार्थी हे युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. यावरुन देशातील विरोधक मोदी सरकारवर जोरदार टीका करत आहेत. मोदी सरकारने योग्य वेळी पावलं न उचलल्याने आज आपली हजारो मुलं संकटात सापडली आहेत. असं असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा यांनी देखील याच मुद्द्यावरुन पुण्यात पत्रकारांशी बोलताना पंतप्रधान मोदींना जोरदार टोला लगावला आहे. […]
ADVERTISEMENT
पुणे: रशिया आणि युक्रेन युद्धामुळे भारतातील हजारो विद्यार्थी हे युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. यावरुन देशातील विरोधक मोदी सरकारवर जोरदार टीका करत आहेत. मोदी सरकारने योग्य वेळी पावलं न उचलल्याने आज आपली हजारो मुलं संकटात सापडली आहेत. असं असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा यांनी देखील याच मुद्द्यावरुन पुण्यात पत्रकारांशी बोलताना पंतप्रधान मोदींना जोरदार टोला लगावला आहे.
ADVERTISEMENT
‘सध्याच्या घडीला आपल्या मुलांना कसं वाचवता येईल हे पाहणं गरजेचं आहे. अपेक्षा ही आहे की, सत्ताधारी अर्थात ज्यांच्या हातात देशाची सूत्रं आहेत त्यांनी यात अधिक लक्ष द्यावं.’
‘मला हे मान्य आहे की, काही महत्त्वाचे प्रकल्प येत आहेत. त्याच्या उद्घाटनाचे कार्यक्रम हाती घेतले जातात. हे महत्त्वाचं आहे पण या महत्त्वाच्या प्रकल्पांसोबत मुलांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करणं ही अधिक महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. बघूया.. आता देशाची सूत्रं ज्यांच्याकडे आहेत ते याची गांभीर्याने नोंद घेतायेत असं आपण समजूयात.’ असं म्हणत पवारांनी मोदींना खास आपल्या शैलीतून टोमणा लगावला आहे.
हे वाचलं का?
पाहा शरद पवार काय-काय म्हणाले:
‘युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मोजावी लागत आहे जबरदस्त किंमत’
ADVERTISEMENT
‘आज हजारो विद्यार्थी युक्रेनमध्ये शिकण्यासाठी जात आहेत. हा एक वेगळा देश आहे. अतिशय सुंदर देश आहे. या देशात कधीकाळी मी दोन-तीनदा गेलो होतो. देशाचा संरक्षणमंत्री असताना आणि तो देश जसं पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे तसंच युक्रेन हे शैक्षणिक हब किंवा शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. त्या ठिकाणी आपले विद्यार्थी हे जात असतात.
ADVERTISEMENT
‘रशिया आणि युक्रेनचा जो संघर्ष चालू आहे त्याची जबरदस्त किंमत ही स्थानिक नागरिकांना मोजावी लागत आहे. त्यात जे बाहेरचे विद्यार्थी आहेत त्यांना तर अधिक त्रास होत आहे. काही विद्यार्थ्यांशी माझं यापूर्वी बोलणं झालं. परराष्ट्र मंत्र्यांशी माझं बोलणं झालं. केंद्र सरकार या मुलांना परत आणण्यासाठी जे-जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न करत आहे. पण तरीही अजूनही विद्यार्थी त्या ठिकाणी अडकून पडले आहेत.’ असं शरद पवार यांनी यावेळी म्हटलं आहे.
‘ज्यांच्या हातात देशाची सूत्रं आहेत त्यांनी यात अधिक लक्ष द्यावं’
‘विद्यार्थ्यांची तक्रार अशी आहे की, भारतीय दूतावासाने त्यांना सांगितलं की, तुम्ही लवकरात लवकर युक्रेनच्या सीमेच्या बाहेर येता येईल असा तुम्ही निर्णय घ्या. मुलांचं म्हणणं असं आहे की, पाच ते सहा तास चालावं लागेल एवढ्या अंतरावर युक्रेनची सीमा संपते आणि रशियाची सीमा येते.’
‘तिथे जायला आमची तयारी देखील आहे पण दोन गोष्टी आहेत एक म्हणजे पाच तास चालत जायचं, भयंकर थंडी आहे आणि यापेक्षाही खरी भीती आहे की, वरुन सातत्याने हल्ला होत आहे. गोळीबार चालू आहे. त्यामुळेच मुलांना बाहेर पडण्याची चिंता वाटते आहे.’
‘माझं म्हणणं एवढंच आहे की, आज जे संकट आहे ते त्या संकटात कोणी काय केलं आणि काय केलं नाही याचा विचार करण्याची किंवा चर्चा करण्याची ही वेळ नाही. यावेळेत सर्वांनी एकत्र येऊन आपल्या मुलांना कसं वाचवता येईल हे पाहणं गरजेचं आहे.’
‘अपेक्षा ही आहे की, सत्ताधारी अर्थात ज्यांच्या हातात देशाची सूत्रं आहेत त्यांनी यात अधिक लक्ष द्यावं. मला हे मान्य आहे की, काही महत्त्वाचे प्रकल्प येत आहेत. त्याच्या उद्घाटनाचे कार्यक्रम हाती घेतले आहेत. हे महत्त्वाचं आहे पण या महत्त्वाच्या प्रकल्पांसोबत मुलांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करणं ही अधिक महत्त्वाची गोष्ट मला वाटते. बघूया.. आता देशाची सूत्रं ज्यांच्याकडे आहेत ते याची गांभीर्याने नोंद घेतायेत असं आपण समजूयात.’ अशा बोचऱ्या शब्दात पवारांनी मोदींना सुनावलं आहे.
‘युक्रेन आणि रशिया संघर्षाचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता’
‘आता या प्रकरणाची तुलना ही लिबियाशी केली जात आहे. पण लिबिया हा खरं तर लहानसा विषय होता. खरं म्हणजे रशिया आणि युक्रेन इथली परिस्थिती ही लिबियाच्या मानाने किती तरी गंभीर आहे. या परिस्थितीची किंमत आपल्या मुलांना मोजावी लागतेय याची काळजी आपण घेतली पाहिजे.’
‘मला या मुलांची जशी काळजी आहे तशीच युक्रेन आणि रशिया यांच्या संघर्षाचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर जो काही दुष्परिणाम होईल त्याची किती किंमत मोजावी लागेल हे आज सांगता येत नाही. मला माहिती आहे.. मी देशाचं कृषी खातं सांभाळलं आहे.’
‘देशात खाद्य तेलाची काय परिस्थिती आहे याची मला कल्पना आहे. आज सूर्यफूल हे खाद्यतेल देणारं महत्त्वाचं पीक आहे. ते सगळ्यात युक्रेनमध्ये घेतलं जातं. पण आजच्या परिस्थितीमुळे सूर्यफूल तेलाची कमतरता भासण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे याची झळ ही सामान्य माणसांना बसू शकते.’ अशी भीती देखील शरद पवारांनी यावेळी व्यक्त केली आहे.
‘भारताच्या भूमिकेमुळे युक्रेनियन नागरिक भारतीय मुलांवर नाराज’
‘चीन आणि भारत यांच्यासह आणखी दोन देशांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे. हे काही नवीन नाही. प. जवारहलाल नेहरु हे या देशाचे नेतृत्व करत होते त्यावेळेस सुद्धा जी आपली पॉलिसी होती त्या पॉलिसीमध्ये शक्यतो संघर्षामध्ये आपण कोणाचीही बाजू घेऊ नये अशीच होती. त्यामुळे आज या ठिकाणी केंद्र सरकारने जी भूमिका घेतली आहे त्याबाबत चर्चा करण्याची आवश्यकता नाही.’
‘फक्त एकच आहे की, युक्रेनमध्ये अडकलेल्या मुलांना लवकरात लवकर कसं मायदेशी परत आणता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे. असं म्हणतात पुतिनशी बोलल्यानंतर एक पॅसेज खुला केला गेला ज्यामुळे मुलांना भारतात परतण्यासाठीचा रस्ता खुला झाला असं सांगण्यात आलं आहे.’
‘मात्र, मुलांशी बोलल्यानंतर ते असं सांगतात की, त्या पॅसेजमधून जाताना आम्हाला दोन अडचण येत आहेत. एक अडचण अशी आहे की, रशियाकडून जो गोळीबार सुरु आहे ती अडचण आहेच. तर मुलं असं सांगतात की, दुसरी अडचण अशी आहे की, आपण (भारताने) जी भूमिका युनायटेड नेशनमध्ये घेतली त्यामध्ये आपण रशिया किंवा युक्रेन यांच्यावर टीका-टिप्पणी केलेली नाही.’
‘आपण तटस्थ राहिलो. त्यामुळे युक्रेनचे स्थानिक नागरिक ही भारतीय मुलांच्याबाबत नाराज आहेत. ते आम्हाला म्हणतात की, तुमच्या देशाने रशियाच्या बद्दल ठोस भूमिका घेतली नाही. त्यामुळे तिथल्या मुलांना यातना होत आहेत अशी तक्रार आहे.’ असं पवारांनी सांगितलं.
युक्रेनमधल्या भारतीयांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी Bridge Of Hope, पियुष गोयल यांनी केलं कौतुक
‘युद्धामुळे देशावासियांना महागाईचं संकट सोसावं लागेल’
‘आता जी इंधनाची दरवाढ थांबवण्यात आलेली आहे ती ठरवून थांबविण्यात आलेली आहे. १० तारखेनंतर लागलीच इंधन दरवाढ होईल असं मी म्हणत नाही. पण महागाईचं संकट हे या युद्धामुळे देशावासियांना सोसावं लागेल. ही गोष्ट नाकारता येत नाही.’ असंही पवार यावेळी म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT