छत्रपती शिवरायांची वाघनखं परत आणणार! जगदंबा तलवारीनंतर शिंदे सरकारची आणखी एक घोषणा
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांची हिरेजडीत जगदंबा तलवार परत आणण्याची घोषणा केल्यानंतर शिंदे सरकारने आणखी एक मोठी घोषणा केली आहे. ब्रिटनच्या ताब्यातील छत्रपती शिवरायांची वाघनखही आता परत भारतात आणणार असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. ते आज मुंबईत बोलत होते. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांची हिरेजडीत जगदंबा तलवार आणि […]
ADVERTISEMENT
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांची हिरेजडीत जगदंबा तलवार परत आणण्याची घोषणा केल्यानंतर शिंदे सरकारने आणखी एक मोठी घोषणा केली आहे. ब्रिटनच्या ताब्यातील छत्रपती शिवरायांची वाघनखही आता परत भारतात आणणार असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. ते आज मुंबईत बोलत होते.
ADVERTISEMENT
सुधीर मुनगंटीवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांची हिरेजडीत जगदंबा तलवार आणि ज्या शस्त्राने अफजल खानाचा वध केला ते वाघनखही ब्रिटनमध्येच आहेत. जून 2024 मध्ये शिवराज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण होत आहेत. तोपर्यंत या दोन्ही गोष्टी परत आणण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील विषय असल्याने यात पुढे काय होईल हे माहित नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
सध्या आम्ही या वाघनखांचे सर्टिफिकेट मागितलं आहे, त्यावरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना वेळ मागितली आहे. आधी त्यांना याबाबत विनंती करु. याविषयाबाबत आम्ही ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनाही पत्र लिहलं आहे. पुढे आवश्यकता असल्यास केंद्र शासनाच्या माध्यमातून आपण सुनक यांच्याशी चर्चा करु असंही यावेळी मुनगंटीवर यांनी सांगितलं.
हे वाचलं का?
शिवराज्याभिषेकाला जून 2024 मध्ये 350 वर्ष पूर्ण :
दरम्यान, जून 2024 मध्ये शिवराज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यादृष्टीने राज्याच्या सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून मोठा आराखडा तयार केला जात आहे. तलवार परत आणण्याची घोषणा करतानाही सुधीर मुनगंटीवार यांंनीसुद्धा याबाबत सांगितलं होतं. याच कार्यक्रमात जर जगदंबा तलवार ब्रिटनने दिली तर तो आनंदोत्सव असेल, असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT