इंटिमेट फोटो लिक झाल्याने नाराज झाला सुकेश, सांगितलं जॅकलिनला महागडी गिफ्ट देण्याचं कारण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

खंडणीसाठी धमकी दिल्याचे आरोप असलेला सुकेश चंद्रशेखर आणि अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीस या दोघांचे काही इंटिमेट फोटो लिक झाले होते. या दोघांचं अफेअर असल्याची चर्चा चांगलीच रंगली होती. त्यानंतर या दोघांचे इंटिमेट फोटो लिक झाले. आता लिक झालेल्या या फोटोंमुळे सुकेश चंद्रशेखर नाराज झाला आहे. हा प्रायव्हसीचा भंग आहे असं सुकेशने म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

सुकेश चंद्रशेखरने आपल्या वकिलांच्या मार्फत एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्याने जॅकलिन आणि त्याचे फोटो लिक झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. सुकेश म्हणतो, असे फोटो लिक होणं खूपच दुःखद आणि त्रासदायक आहे. ज्याप्रकारे फोटो सर्क्युलेट करण्यात आले आहेत ते मुळीच पटलेलं नाही. आमचे फोटो लिक झाल्याची माहिती मला न्यूज द्वारे समजली. अशा पद्धतीने फोटो लिक होणं हा प्रायव्हसीचा भंग आहे. एवढंच नाही किमान यानंतर असे फोटो व्हायरल केले जाऊ नयेत अशीही इच्छा त्याने या पत्रात व्यक्त केली आहे.

हे वाचलं का?

सुकेश म्हणतो, ‘मी सगळ्यांना हे निवेदन करतो की जॅकलिनची प्रतिमा डागाळली जाईल असं काहीही करू नका. कारण हे सगळं तिच्यासाठी सोपं नव्हतो. कोणत्याही स्वार्थाशिवाय मला तिचं प्रेम मिळालं. मी आधीही सांगितलं आहे की मनी लॉड्रींग प्रकरणाशी काहीही संबंध नाही. मी जॅकलिनला आणि तिच्या कुटुंबीयांना जी गिफ्ट दिली ती फक्त प्रेमाखातर दिली.’

सुकेश आणि जॅकलिनसोबत आपलं काहीही अफेअर वगैरे नव्हतं अशाही बातम्या समोर आल्या होत्या. मात्र आपल्या पत्रात जॅकलिनसोबतचं नातं सुकेशने मान्य केलं आहे. जॅकलिन आणि मी एका चांगल्या नात्यात होतो. कोणत्याही फायद्यासाठी आम्ही हे नातं जोडलं नव्हतं असंही सुकेशने म्हटलं आहे. आमचं नातं होतं हे ज्या प्रकारे दाखवलं जातं आहे ते चुकीचं आहे. आमच्या नात्यात आम्हाला एकमेकांविषयी प्रेम आणि आदर होता. कोणत्याही अपेक्षेशिवाय ते नातं तयार झालं होतं. सुकेशने त्याच्या पत्रात हे पण म्हटलं आहे की जॅकलिनची या सगळ्यामध्ये काहीही चूक नाही.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

जॅकलिन फर्नांडिसला सुकेश राजकुमारीसारखं वागवत होता

जॅकलिन आणि शेखऱ उर्फ सुकेश चंद्रशेखर जवळ येत गेले तसे तो जॅकलिनला अनेक महागडी गिफ्ट देऊ लागला. या भेटींची किंमत कोट्यवधी रूपये होते. सुकेशने आत्तापर्यंत जॅकलिनला सात कोटी रूपयांची गिफ्ट दिली आहेत असा अंदाज वर्तवला जातो आहे.

या भेटवस्तूंमध्ये बिर्किन बॅग, Chanel, Gucci, YSL या ब्रांडचे कपडे, हर्मीस ब्रांडच्या बांगड्या, टिफनी ब्रांडचं ब्रेसलेट, अंगठ्या, झुमके यांचा समावेश आहे. एवढंच नाही तर रोलेक्स, रोजर डुबईस, फ्रेंक मुलर या ब्रांडची घड्याळं देऊनही जॅकलिनचं मन जिंकण्याचा प्रयत्न सुकेशने केला. फक्त जॅकलिनलाच नाही तर तिच्या कुटुंबीयांनाही गिफ्ट देण्यात आली. तिच्या आईला एक पोर्श आणि मासेराती कार सुकेशने भेट म्ङणून दिली. जॅकलिनने मात्र आपल्या कुटुंबीयांनी गिफ्ट घेतली नसल्याचं म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT