महाराष्ट्राला केंद्राकडून कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींचा पुरवठा, जाणून घ्या किती लसी मिळणार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्राला केंद सरकारकडून कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींचा पुरवठा मंजूर करण्यात आला आहे. देशातल्या सगळ्याच राज्यांना किती लसी देण्यात आल्या आहेत याची यादी केंद्र सरकारने प्रसिद्ध केली आहे. मेच्या पहिल्या पंधरवड्यात या लसी महाराष्ट्राला उपलब्ध होणार आहेत. 45 वर्षे आणि त्यावरील लोकांचं लसीकरण यामुळे शक्य होणार आहे. महाराष्ट्राला एकूण 23 लाख 27 हजार 510 लसी उपलब्ध होणार आहेत.

ADVERTISEMENT

आपण पाहुया महाराष्ट्राच्या वाट्याला पहिल्या पंधरा दिवसात किती लसी येणार?

कोव्हिशिल्ड – 17 लाख 50 हजार 620 डोस

हे वाचलं का?

कोव्हॅक्सिन – 5 लाख 76 हजार 890 डोस

‘Vaccines मोदी सरकारने विदेशात पाठवल्या नसत्या तर आज तुटवडा भासला नसता’

ADVERTISEMENT

महाराष्ट्रात लस तुटवडा मोठ्या प्रमाणावर भासतो आहे. अशात १२ कोटी लसी आम्हाला द्या त्या आम्ही एक रकमी चेकने पैसे देऊन घ्यायला तयार आहोत असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. या लसींचा उपयोग 18 ते 44 या वयोगटाला लसी देण्यासाठी करता येईल असंही ते म्हणाले होते. तसंच 45 पासून पुढे ज्यांचं लसीकरण करण्यात येतं आहे तो पुरवठा केंद्र सरकारने थांबवू नये असंही आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. कोविनसारखं अॅप प्रत्येक राज्याला विकसित करण्याची संमती द्या जेणेकरून ते अॅप क्रॅश होणार नाही असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

महाराष्ट्र दिनी मुंबईतील पाच लसीकरण केंद्रांवर 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींचं लसीकरण

अजित पवारांची केंद्र सरकारवर टीका

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारवर लसीकरणावरून टीका केली आहे. विदेशात जर व्हॅक्सिन पुरवण्यात आल्या नसत्या तर आपल्या देशाला लसींचा पुरवठा कमी पडला नसता असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. लस परदेशात पाठवण्याऐवजी आपल्या लोकांना देणं ही केंद्र सरकारची प्राथमिकता हवी होती. तसं केलं असतं तर आज एवढा लस तुटवडा भासला नसता असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

देशाच्या आरोग्य व्यवस्थेवर सध्या ताण पडतो आहे. ऑक्सिजन, रेमडेसिवीर यांचा पुरवठा करण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. देशाबाहेरील जिथे लसी तयार केल्या जात आहेत त्या देखील खरेदी करण्याची राज्य सरकारची तयारी आहे. सध्या राज्यात 45 वर्षांवरील नागरिकांसाठी लसीचे डोस शिल्लक नाहीत असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT