NCP: ‘एकच छंद, गोपीचंद…’ घोषणाबाजी करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

विजयकुमार बाबर, सोलापूर

ADVERTISEMENT

भाजपचे (BJP) विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (mlc gopichand padalkar) यांच्या गाडीवर दगडफेक केल्याची घटना ताजी असतानाच आता सोलापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) कार्यालयावर दगडफेक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. यामुळे आता सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप (BJP) असा सामना रंगण्याची शक्यता आहे.

सोलापुरात राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयावर गोपीचंद पडळकर समर्थकांनी दगडफेक केली आहे. या दगडफेकीत कार्यालयाच्या दरवाजा आणि खिडकीवर दगडफेक करण्यात आली. यावेळी दगडफेक करणाऱ्या दोन तरुणांना सदर बझार पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हे वाचलं का?

शरनू हांडे आणि सोमनाथ घोडके या दोन पडळकर समर्थकांनी राष्ट्रवादी भवन या रामलाल चौकातील राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयावर दगडफेक केली आहे. यावेळी त्यांनी ‘एकाच छंद गोपीचंद’ अशा घोषणाही दिल्या. दगडफेक करणारे हे दोन्ही तरुण स्वतःहून फौजदार चावडी पोलीस स्टेशनला हजर झाले त्यांना सदर बझार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

दरम्यान, काल झालेल्या घटनेचे पडसाद असून यामुळे सोलापूरमधील वातावरण तंग झालं आहे.

ADVERTISEMENT

पडळकरांच्या गाडीवर दगडफेक

ADVERTISEMENT

आमदार गोपीनाथ पडळकर यांच्या गाडीवर काल (30 जून) दगडफेक करण्यात आली. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पडळकर सध्या अनेक ठिकाणी जाऊन घोंगडी बैठका घेत आहेत. याच दरम्यान, सोलापूरमधील श्रीशैल नगरातील महादेव मंदिराजवळ अचानक एका तरुणाने भला मोठा दगड पडकरांच्या गाडीवर मारला.

दरम्यान या घटनेनंतर पडळकरांनी पुन्हा एकदा पवारांवर हल्लाबोल केला होता. ‘पवारांच्या नेतृत्वाखाली गुंडगिरी कशी चालते हे आता राज्याला माहिती आहे. माझी इथे कोणाशीही ओळख नाही किंवा शत्रुत्व नाही, तरीही कोणाला तरी पुढे करुन माझ्यावर हल्ला झाला आहे. माझा आवाज असा बंद होणार नाही, उद्या मला गोळ्या घातल्यात तरीही मी मागे हटणार नाही.’ असं पडळकर म्हणाले होते.

पडळकरांनी पवारांवर नेमकी काय टीका केली होती?

‘मी लहान असल्यापासून शरद पवार हे भावी प्रधानमंत्री आहेत आणि त्यांच्या पुढच्या 30 वर्षाच्या भावी पंतप्रधान पदासाठी माझ्या मनापासून हार्दिक शुभेच्छा आहेत. त्यांचे या राज्यात 3 ते 4 खासदार आहेत. साडेतीन जिल्ह्याच्या बाहेर त्यांचा पक्ष नाही.’ अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर केली होती.

‘दिल्लीतील राजकारण मला कळत नाही. पण कोंबड्याला काय वाटतं की, मी आरवल्याशिवाय उजाडतच नाही. असे काही कोंबडे दिल्लीत एकत्र आले होते. त्यांनी अनेक बैठका घेतल्या. पण यांचं असं झालेलं आहे की, रात गेली हिशोबात, पोरगं नाही नशीबात… अशी परिस्थिती या लोकांची चालू आहे.’ पवारांवर अशा शब्दात पडळकरांनी टीका केली होती.

सोलापूर : आमदार गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगडफेक, घोंगडी बैठकीवरुन परतताना झाला हल्ला

‘पवार मोठे आहेत हे मी स्वत: मानत नाही. कोण मानत असतील त्याचं मला देणंघेणं नाही. साडेतीन जिल्ह्याचा स्वामी आणि ज्याचे तीन खासदार आहेत त्यांना मोठं कोण मानणार?’ अशी जोरदार टीका गोपीचंद पडळकर यांनी केली होती.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT