Uddhav thackeray-फडणवीस यांची बंद दाराआड चर्चा, सुप्रिया सुळे म्हणतात…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात काल बंद दारांच्या आड चर्चा झाली. दहा मिनिटांसाठी झालेल्या या चर्चेचा विषय राज्यभरात गाजतो आहे. अशात याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? माझे आयुष्य ब्रेकिंग न्यूज नाही मी कुठल्याही गोष्टीवर विचारपूर्वक प्रतिक्रिया देते… इंस्टंट कॉफीवर माझा विश्वास नाही.. […]
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात काल बंद दारांच्या आड चर्चा झाली. दहा मिनिटांसाठी झालेल्या या चर्चेचा विषय राज्यभरात गाजतो आहे. अशात याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ADVERTISEMENT
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
माझे आयुष्य ब्रेकिंग न्यूज नाही मी कुठल्याही गोष्टीवर विचारपूर्वक प्रतिक्रिया देते… इंस्टंट कॉफीवर माझा विश्वास नाही.. माझ्यावर ज्या कै यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार झाले आहेत त्यांचे प्रत्येक पक्षात चांगले संबंध होते. राजकीय नेत्यांचे एकमेकांशी चांगले संबंध असणं काहीही गैर नाही. महाराष्ट्राच्या राजकारणाची परंपरा तशीच आहे. राजकीय मतभेद आणि विरोध आणि परस्पर संबंद या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्यानंतर या भेटीमुळे महाविकास आघाडीचं काय? असा प्रश्न पडला आहे का? असं विचारताच महाविकास आघाडीचे सरकार 5 वर्ष नाही तर 25 वर्ष राज्यातील जनतेची सेवा करत राहील असं उत्तर सुप्रिया सुळे यांनी दिलं आहे. नागपूरमध्ये आल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
हे वाचलं का?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआड काय चर्चा झाली?
ADVERTISEMENT
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना झालेल्या अटकेनंतर हा संघर्ष कुठेतरी तीन पातळ्यांवर सुरू आहे अशी चर्चा होती. शिवसेना विरूद्ध नारायण राणे. शिवसेना विरूद्ध भाजप आणि राज्य विरूद्ध केंद्र सरकार. मात्र हाच मेसेज केंद्रापर्यंत जाऊ नये हा या बैठकीमागचा आणि बंद दाराआड झालेल्या चर्चेचा विषय होता असं मुंबई तकला खात्रीलायक सूत्रांनी सांगितलं आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. ज्याचे पडसाद बुधवारी राज्यभर उमटलेले पाहण्यास मिळाले.
ADVERTISEMENT
बुधवारीच नारायण राणे यांना अटकही झाली. ही अटकेची कारवाई नारायण राणेंनी केलेल्या वक्तव्यामुळे झाली. हा कुठेही राज्य विरूद्ध केंद्र किंवा शिवसेना विरूद्ध भाजप असा संघर्ष नव्हता हेच बंद दाराआड झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगण्याचा प्रयत्न केला. नारायण राणे यांनी याआधी पूर परिस्थितीची पाहणी करतानाही सीएम बीएम गेला उडत असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांनी जेव्हा राज्यात येऊन जनआशीर्वाद यात्रा सुरू केली तेव्हा नारायण राणे यांनी शिवसेनेवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर आरोप करण्यास सुरूवात केली. इथवर शिवसेना शांत बसली होती. मात्र नारायण राणे यांनी ते अमृत महोत्सवाची माहिती मुख्यमंत्र्यांना कशी नाही हे सांगत असताना कानशीलात लगावली असती असं जे वक्तव्य केलं ते साहजिकच शिवसेनेला सहन झालं नाही.
नारायण राणे यांनी जेव्हा ते वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्यानंतर भाजप विरूद्ध शिवसेना असा संघर्ष सुरूवातीला झाला. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा याबाबत पत्रकार परिषद घेतली तेव्हा त्यांचं पहिलंच वाक्य हे होतं की नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत केलेलं वक्तव्य योग्य नाही. त्या वक्तव्याचा पाठिंबा भाजप करत नाही. नेमकं हेच उद्धव ठाकरेंनीही देवेंद्र फडणवीस यांना सांगण्याचा प्रयत्न केला. आमचा आत्ताचा संघर्ष हा भाजपविरोधी किंवा मोदी सरकारविरोधी नसून नारायण राणे यांच्या वक्तव्याचा विरोध दर्शवणारा आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फडणवीस यांना सांगितलं.
आता या भेटीबाबत सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे, महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय मतभेद वगळले तर परस्परांमध्ये चांगले संबंध असतात आणि त्यात काही गैर नाही असं त्या म्हणाल्या आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT