Lok Sabha 2024 : सुप्रिया सुळेंच्या करेक्ट कार्यक्रमासाठी भाजपचा बैठकांचा धडाका सुरू

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भाजपने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात मिशन ४३ हाती घेतलंय. त्यामुळे शिंदे गटातल्या खासदारांचं काय होणार याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. त्याचवेळी आता विरोधी पक्षांचे बालेकिल्ले हिसकावण्यासाठीही भाजपने रणनिती आखलीय.

ADVERTISEMENT

महाराष्ट्रात मातब्बरांचा राहुल गांधी करण्याचा डाव टाकला जातोय. शरद पवारांना बालेकिल्ल्यातच घेरण्यासाठी भाजपनं बैठकांचा धडाका सुरू केलाय. त्यामुळेच तिनवेळच्या खासदार राहिलेल्या सुप्रिया सुळेंचा २०२४ मध्ये करेक्ट कार्यक्रम होणार का? भाजपची नेमकी स्ट्रॅटेजी?

Supriya Sule: “मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची खूप काळजी वाटते, देवेंद्र फडणवीस…”

हे वाचलं का?

लोकसभा निवडणुकीला अजून दोनअडीच वर्ष शिल्लक आहेत. पण भाजपनं आतापासून तयारी सुरू केलीय. तिसऱ्यांदा निवडून येण्यासाठी प्रत्येक राज्याला टार्गेट ठरवून देण्यात आलंय. आणि त्यासाठी थेट दिल्लीतून नेतेमंडळी पाठवून स्ट्रॅटेजी राबवली जातेय. महाराष्ट्रात भाजपनं ४८ पैकी ४३ जागा जिंकण्याचं मिशन ठरवलंय.

‘देशाच्या अर्थमंत्री बारामतीत आल्यास मी त्यांचं स्वागत करेन;’ सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?

ADVERTISEMENT

त्यासाठी केंद्रीय मंत्र्यांचे मुक्कामी दौरे आयोजित करण्यात आले. यासाठीच मोदी सरकारमधील मातब्बर मंत्री निर्मला सीतारामन बारामतीत येणार आहेत. २२, २३ आणि २४ सप्टेंबर असे तीन दिवस त्यांचा दौरा असणार आहे. याच दौऱ्यासाठी भाजपने बारामतीत बैठकांचा धडाका लावलाय.

ADVERTISEMENT

आमदार राम शिंदेंपाठोपाठ आता नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हेही बारामतीला जाणार आहेत. देंनी बारामती मतदारसंघातील इंदापूरला भेट दिली. यावेळी राम शिंदेंनी सुप्रिया सुळेंनी राहुल गांधीसारखाचा आता सुरक्षित मतदारसंघ शोधावा, दुसरा वायनाड शोधा.

”बारामती काय अजित पवारच्या बापाची आहे का?”, दादा पत्रकारांवरती का भडकले?

यंदा काहीही झालं, तरी बारामती जिंकणारच, असा दावा केलाय. त्यामुळे शिंदेंचा दावा आणि भाजपची रणनीती यशस्वी ठरणार का हे २०२४ लोकसभा निवडणुकीनंतरच कळेल, पण तोपर्यंत हा राजकीय संघर्ष सुरूच असणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT