आम्ही सुपर स्प्रेडर आहोत असं कसं बोललात?; सुप्रिया सुळेंचा मोदींना सवाल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विधानाचे राज्यात पडसाद उमटले आहेत. राजकीय वर्तुळातूनही संताप व्यक्त होत असून, राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही मोदींच्या विधानावर टीकास्त्र डागलं आहे.

ADVERTISEMENT

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर बोलताना काँग्रेसवर निशाणा साधला होता. यावेळी काँग्रेसने महाराष्ट्रातून उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पंजाबमध्ये कोरोना पसरवण्यासाठी मजुरांना पाठवलं, असं विधान त्यांनी केलं.

‘महाराष्ट्र नव्हे गुजरातमधून सर्वाधिक सोडण्यात आलेल्या श्रमिक स्पेशल ट्रेन’, आकडेवारी देत NCP ने मोदींना खिंडीत गाठलं?

हे वाचलं का?

त्यांच्या विधानावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘काल संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं दीड तासांचं भाषण होतं. खूप अपेक्षने मी या भाषणाकडे पाहत होते. सध्या आपला देश अडचणीतून चालला आहे. त्यामुळे राज्यांनी पुढे कसं मार्गक्रमण करावं याबाबत पंतप्रधानांनी दिशा द्यावी असं वाटत होतं.’

‘आपण जीएसटीच्या एका टप्प्यावर आहोत. कोरोनाची तिसरी लाट ओसरते आहे. नव्या नोकऱ्या निर्माण होत नाही. त्यामुळे पंतप्रधान म्हणून ते काही मार्गदर्शन करतील असं वाटत होतं. पण ते महाराष्ट्राबद्दल जे बोलले ती वेदनादायी गोष्ट आहे. मोदींच्या या विधानाने मला प्रचंड वेदना झाल्या. महाराष्ट्राबद्दल मोदी असं का बोलत आहेत?’, असा सवाल सुळे यांनी उपस्थित केला.

ADVERTISEMENT

“चुनावजीवी’! संसदेलाही बनवले प्रचाराचा आखाडा; मोदींच्या डोळ्यांसमोर पंजाब, युपीच्या निवडणुका”

ADVERTISEMENT

‘महाराष्ट्राने भाजपला 18 खासदार दिले. मोदी पंतप्रधान आहेत, त्यात महाराष्ट्रातील मतदारांचा मोठा वाटा आहे. त्यांनी या मतदारांचा अपमान केला. कोविड स्प्रेडर म्हणून महाराष्ट्राचा अपमान केला. ते केवळ भाजपचे पंतप्रधान नाहीत. ते देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांच्या या विधानामुळे दु:ख झालं. पंतप्रधानपद हे केवळ एखाद्या पक्षाचं पद नाही. ते संवैधानिक पद आहे. त्यामुळे त्यांचं विधान अधिक दु:खदायक होतं,’ अशी भूमिका सुळे यांनी मांडली.

‘आम्ही सुपर सप्रेड आहोत असं कसं बोललात? तुम्ही शास्त्रीय आधार देऊन आरोप केला असता, तरी मी कबूल केला असता. मी केवळ टीका करायची म्हणून टीका करत नाही. मी महाराष्ट्राची कन्या म्हणून त्यांच्याकडे न्याय मागते आहे. तुम्ही का म्हणून असा आरोप केला? का तुम्ही राज्या-राज्यात द्वेष पसरवत आहात?.’

PM Modi Live: ‘… वो आइने को भी तोड़ देंगे’; मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

‘पंजाब ही संताची भूमी आहे. त्यांचं आपलं नातं जवळचं आहे. उत्तर प्रदेशशी आपलं नातं आहे. चंद्रशेखर यांचं महाराष्ट्रावर विशेष प्रेम होतं. ते पंतप्रधान होऊन गेले. यूपी-बिहारचे लोक आपल्याकडे येतात. पण आपल्यात आणि त्यांच्यात अंतर आणण्याचं काम पंतप्रधानांच्या भाषणातून होऊ शकतं हे धक्कादायक आणि दुर्देवी आहे’, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी मोदींवर निशाणा साधला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT