गडचिरोली: आत्मसमर्पित नक्षलवाद्यांनी उभारला फिनाईल निर्मितीचा उद्योग
व्यंकटेश दुडुमवार, गडचिरोली जी पावलं कधी काळी हिंसक चळवळीच्या चिखलात रूतली होती. त्या पावलांनी आज उद्योग क्षेत्रात नव्या दिशेने प्रवास सुरु केला आहे. हे शक्य झालं गडचिरोली पोलिसांच्या आत्मसमर्पण नवजीवन योजनेमुळे. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी ‘नवजीवन’ योजनेच्या माध्यमातून त्यांना फिनाईल उत्पादनाचे नवे बळ प्राप्त झाले आहे. […]
ADVERTISEMENT
व्यंकटेश दुडुमवार, गडचिरोली
ADVERTISEMENT
जी पावलं कधी काळी हिंसक चळवळीच्या चिखलात रूतली होती. त्या पावलांनी आज उद्योग क्षेत्रात नव्या दिशेने प्रवास सुरु केला आहे. हे शक्य झालं गडचिरोली पोलिसांच्या आत्मसमर्पण नवजीवन योजनेमुळे.
आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी ‘नवजीवन’ योजनेच्या माध्यमातून त्यांना फिनाईल उत्पादनाचे नवे बळ प्राप्त झाले आहे. गडचिरोली पोलिसांच्या सहकार्याने 11 आत्मसमर्पित महिलांनी फिनाईल निर्मिती उद्योग चालू केला असून आर्थिक सक्षमतेकडे नवे पाऊल टाकले आहे.
हे वाचलं का?
या महिलांनी वर्धा येथील एम गिरी संस्थेत प्रशिक्षण घेत नवजीवन उत्पादक संघ नावानी ही संस्था उभारली. 13 नोव्हेंबरला याचे उदघाटन झाले आणि त्यांना 1100 लिटर फिनाईलचे ऑर्डर सुद्धा पोलीस विभागाने दिले आहे.
या उद्योगतील आत्मासमर्पित महिला नक्षल पूर्वी जंगलात राहून हिंसक कारवायात सक्रिय होत्या. एकेदिवशी या निरर्थक जीवघेण्या जीवनाला कंटाळून त्यांनी आत्मासमर्पण केलं. केंद्र शासन व राज्य शासनाच धोरण आहे ज्या नक्षलवादी आत्मसमर्पण करतात त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पोलीस विभागही शक्य ते सहकार्य करून नवे जीवन देण्याचे कार्य करत आहे.
ADVERTISEMENT
‘क्लीन 100’ या नावाने असलेल्या या फिनाईलला प्रायोगिक तत्वावर सरकारी कार्यालयांकडून ऑर्डर मिळाली आहे. पुढे घरगुती वापरासाठी देखील मार्केटमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. या संघाची अध्यक्ष पूर्वी नक्षल्यांची कमांडर होती. जवळपास 10 वर्ष तिने चळवळीत काढली.
ADVERTISEMENT
मात्र आत्मसमर्पणामुळे त्यांच्या जीवनाला नवी कलाटणी मिळाल्याची प्रतिक्रिया व्यक्त करीत आहे. कधी काळी जंगलात भटकावं लागायचं, आता, मात्र नक्षल्यांना कुटुंब आहे. हाताला काम आहे, मुख्य प्रवाहात आल्यामुळे सन्मानाने जगायला मिळतं आहे. हा फिनाईल निर्मितीचा उद्योग आत्मसमर्पित नक्षल्यांसाठी बनविण्यात आलेल्या नवजीवन वसाहतीत सुरु करण्यात आलं आहे.
‘नक्षल चळवळीत असताना खडतर आयुष्य होतं. आता मात्र तशी परिस्थिती नाही. पोलीस विभागाच्या सहकार्याने आम्हाला विविध योजनेतून घर, जमीन मिळाली. या व्यवसायच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी मिळत आहे.’ असं आता महिला सांगत आहेत.
‘आत्मसमर्पणानंतर आमचं आयुष्यच बदललं. एकेकाळी दोन वेळच्या जेवणाची आणि जीवाची शाश्वती नव्हती. आज मात्र आम्हाला सन्मानाने जगायला मिळत आहे. इतरांनी देखील तो हिंसक मार्ग सोडून सन्मानाने जगण्याचा मार्ग निवडावा.’ असंही या महिलांचं मत आहे.
दिशाभूल करून आदिवासी तरुण-तरुणींना लहान वयात नक्षल चळवळीत ढकलणाऱ्या नक्षल्यांपेक्षा सन्मानाने जगाविणारे पोलीस बरे. अशी भावना आज आत्मसमर्पित तरुणी बोलून दाखवत आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात या रक्तरंजित चळवळीमुळे गेल्या तीन दशकात कित्येक जणांचे जीव गेले आहेत. कित्येक कुटुंब ही देशोधडीला लागली. पण यातून काहीच साध्य झालं नाही. हे आता नक्षल्यांना देखील लक्षात येत आहे. त्यामुळेच आत्मसमर्पित नक्षल्यांची संख्या वाढत आहे.
नक्षलवादी भागातील तरुणांना पोलिसांच्या मदतीने मिळणार नोकऱ्या
दुसरीकडे पोलीस प्रशासन देखील आत्मसमर्पण केलेल्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच नक्षलग्रस्त जिल्ह्यात आज काहीसं बदलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT