Sushil Kumar: ऑलिम्पिक पदक विजेता ते खुनातील आरोपी; काय आहे नेमकं प्रकरण?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नवी दिल्ली: ऑलिम्पिक पदक विजेता (Olympic medal Winner) आणि कुस्तीपटू सुशील कुमार (Sushil Kumar) हा मागील अनेक दिवसांपासून एका हत्या (Murder) प्रकरणात फरार होता. ज्याला काल (23 मे) दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) अटक (Arrest) केली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने सुशील कुमारला अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार स्पेशल सेलने दिल्लीच्या मुंडका भागातून सुशील कुमार आणि त्याचा साथीदार अजय बक्करवाला यांच्या मुसक्या आवळल्या.

ADVERTISEMENT

खरं तर हे दोघेही आपली कार सोडून स्कूटीवर कुणाला तरी भेटायला जात असताना त्यांना अटक करण्यात आली होती. गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेल्या सुशील कुमारवर 1 लाखांचे तर त्याचा मित्र अजय याच्यावर पन्नास हजार रुपयांचे बक्षीस घोषित करण्यात आले होते. अजय हा सरकारी शाळेत कर्मचारी म्हणून काम करत होता. तो कॉंग्रेसचे नगरसेवक सुरेश बक्करवाला यांचा मुलगा आहे.

सर्वात आधी काल (23 मे) दिवसभरात या संपूर्ण प्रकरणात काय घडलं त्यावर टाकूयात एक नजर:

हे वाचलं का?

  • 7:15 PM: कुस्तीपटू सुशील कुमार आणि त्याच्या साथीदारांना कोर्टाने 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. स्पेशल सेलने आरोपींना पीएस मॉडेल टाऊनच्या आयओकडे सोपवले आहे.

  • 5:30 PM: कुस्तीपटू सुशील कुमार याच्या 12 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. सुशीलच्या वकिलांनी या कोठडीला विरोध केला होता.

  • ADVERTISEMENT

  • 4:25 PM: कुस्तीपटू सुशील कुमारला रोहिणी येथे ड्युटी मॅजिस्ट्रेटसमोर हजर करण्यात आलं. कोर्टाच्या आत पोलिसांना त्याची 30 मिनिटे चौकशी करण्याची परवानगी मिळाली.

  • ADVERTISEMENT

  • 3:20 PM: छत्रसाल स्टेडियमवर झालेल्या हाणामारीत सुशील कुमार सहभागी होता. याबाबत सुशीलने माहिती दिली की, घटनेनंतर तो घरी येऊन झोपला.

  • 3:10 PM: आज तकने त्यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपावरून सुशील कुमार याला प्रश्न देखील विचारले, पण सुशील कुमार याने कोणतेही उत्तर दिले नाही.

  • 3:00 PM: सुशील कुमार आणि अजयला यांना मोठ्या सुरक्षा ताफ्यासह पोलिसांनी विशेष सेलच्या रोहिणी कोर्टात नेलं. यापूर्वी या दोघांचीही वैद्यकीय चाचणी करण्यात आली.

  • Sushil Kumar Arrested : ऑलिम्पिक पदक विजेता ते हत्येचा आरोपी, जाणून घ्या आतापर्यंत काय-काय घडलं?

    हत्या प्रकरणातील आरोपी सुशील कुमारला अटक करण्यासाठी पोलिसांनी पंजाबमधील भटिंडा, मोहालीसह अनेक राज्यात छापे मारले होते. दिल्ली पोलिसांनी बर्‍याच ठिकाणी छापा मारले पण सुशील कुमार त्यांना कुठेही सापडला नव्हता. अखेर काल (23 मे) त्याला दिल्लीतून अटक करण्यात आली.

    ऑलिम्पिक पदक विजेता हा कुस्तीपटू एखाद्या व्यावसायिक गुन्हेगारासारखा पोलिसांना चकमा देत होता. या दरम्यान सुशील कुमार हा वेगवेगळ्या नंबरवरुन आपल्या जवळच्या लोकांशी संपर्कात होता. दिल्ली पोलिसांची अनेक पथके सुशील कुमारचा शोध घेत होती. अखेर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या पथकाने त्याला दिल्लीतूनच अटक केली.

    मिळालेल्या माहितीनुसार, फरार असताना सुशील कुमार हा हरियाणा आरटीओ नंबरची कार वापरत होता. पण नंतर त्याने ती कार सोडून दिलली आणि एक स्कूटी वापरत होता.

    सुशील कुमार याच्यावर 23 वर्षीय कुस्तीपटू सागर राणा याची दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियममध्ये हत्या केल्याचा आरोप आहे. दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सुशील कुमार, लॉरेन्स विश्नोई आणि काला जाखेडी यांच्या टोळीतील गुंडांना सोबत घेऊन स्टेडियममध्ये गेला. जिथे सागरसह इतर काही मारहाण करण्यात आली. ज्यामध्ये कुस्तीपटू सागरचा मृत्यू झाला.

    Chatrasal Murder Case : खिशातले पैसे संपले, सुशील बाहेर पडला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला

    सुशील कुमार अडकलेल्या हत्येचे नेमके काय कारण आहे?

    पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुशील कुमारच्या पत्नीच्या नावे एक फ्लॅट आहे. जो काही दिवसांपूर्वी सागरला भाड्यावर देण्यात आला होता. पण दोन महिन्याचं भाडं न देता त्याने तो फ्लॅट तसाच सोडून दिला. त्यावरुनच हा सगळा वाद झाला. पण याबद्दलची आणखी एक माहिती अशी याच फ्लॅटमध्ये दिल्लीतील अनेक गुन्हेगार आश्रय घेत होते. सुशील त्यांना आपल्या फ्लॅटमध्ये राहू देखील देत होता.

    दिल्ली पोलिसांकडून संदीप काला नावाचा गुन्हेगारी तिथे काही दिवस वास्तव्यास होता. याच फ्लॅटमध्ये काही दिवसांपूर्वी सागर राहत होता. जो सुशील त्याला खाली करण्यास सांगितला. ज्यावरून बराच वाद झाला. त्यानंतर सुशील कुमारने गुंड कला जाखेडी यांच्या गुंडांसह छत्रसालमध्ये सागरला मारहाण केली आणि सागरचा मृत्यू झाला.

    सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या हत्येनंतर गुंड काला जाखेडी याने सुशील कुमारला देखील धमकी दिली आहे. दरम्यान, फरार असताना सुशील कुमारने काला जाखेडी यांच्याशी समेट करण्याचा देखील प्रयत्न केला होता. त्यांच्यात समेट झाला की नाही हे मात्र अद्याप समोर आलेलं नाही.

    ADVERTISEMENT

      follow whatsapp

      ADVERTISEMENT