Vidhan Sabha: ’12 आमदारांचं निलंबन, पण आमच्या गळाला त्यांचे दुप्पट आमदार’, Narayan Rane यांचा मोठा दावा
सिंधुदुर्ग: ‘यांनी जरी आमच्या बारा आमदारांचं (MLA) निलंबन केलं असलं तरीही महाविकास आघाडीमधील तीनही पक्षाचे अनेक आमदार आमच्या गळाला लागले आहेत. जेवढे निलंबन केले आहेत त्याचा दुप्पट आमदार आमच्या संपर्कात आहेत.’ असं वक्तव्य भाजपचे (BJP) खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी केलं आहे. सिंधुदुर्गात (Sindhudurga) घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘महाविकास आघाडी सरकार […]
ADVERTISEMENT
सिंधुदुर्ग: ‘यांनी जरी आमच्या बारा आमदारांचं (MLA) निलंबन केलं असलं तरीही महाविकास आघाडीमधील तीनही पक्षाचे अनेक आमदार आमच्या गळाला लागले आहेत. जेवढे निलंबन केले आहेत त्याचा दुप्पट आमदार आमच्या संपर्कात आहेत.’ असं वक्तव्य भाजपचे (BJP) खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी केलं आहे. सिंधुदुर्गात (Sindhudurga) घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ADVERTISEMENT
‘महाविकास आघाडी सरकार पडणार हे यांना माहित होतं. त्यामुळे आपलं सरकार वाचविण्यासाठी त्यांनी भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन केलं. लवकरच हे सरकार पडणार होतं. त्यामुळे भाजपची संख्या कमी केली की आपण सेफ झालो, आपली दुकानं चालू ठेऊ शकतो. म्हणून त्यासाठी केलेल्या प्रयत्नांपैकी 12 आमदार निलंबन हा त्यातला एक प्रकार आहे.’ असं म्हणत नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला.
‘आदित्य सांगेल त्याच फाइलवर मुख्यमंत्री सही करतात’
हे वाचलं का?
‘मुख्यमंत्री कोणाला भेटत नाहीत. अधिवेशन फक्त दोन दिवसांचं. मंत्रालयातही मुख्यमंत्री लोकांना भेटत नाहीत. अधिकाऱ्यांशी चर्चा करत नाही. हे सरकार फक्त आदित्यसाठी चाललं आहे. आदित्य सांगेल त्या फाइलवरच मुख्यमंत्री सही करतात.’ असं म्हणत नारायण राणे यांनी पुन्हा एकदा ठाकरे कुटुंबीयांवर टीका केली आहे.
‘स्वतःला वाघ म्हणायचं पण कोल्ह्यासारखा पळ काढायचा’
ADVERTISEMENT
‘महाराष्ट्रात जटील, गंभीर प्रश्न असताना सरकार दोन दिवसाचं अधिवेशन घेऊन पळ काढत आहे. अधिवेशनाच्या आधी पत्रकार परिषद मुख्यमंत्र्यांनी घ्यायची असते. मात्र ते पळून गेले. त्यांना कोणतही गांभीर्य नसल्यामुळे यांनी दोन दिवसाचं अधिवेशन ठेवलं. एका बाजूला स्वतःला वाघ म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूने कोल्ह्यासारखा पळ काढायचा.’
ADVERTISEMENT
‘हे सरकार फक्त भ्रष्टाचार करून पैसे कमवणं हा एक कलमी कार्यक्रम राबवत आहे. आता अनेक मंत्र्यांचा भ्रष्टाचार बाहेर येतो आहे. अनिल परब, अनिल देशमुख अशा मंत्र्यांवर भष्टाचाराचे आरोप होत आहेत.’ असं म्हणत नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली.
‘महाराष्ट्राचं अधिवेशन फक्त दोन दिवसांचं का?’
‘दरम्यान, राज्यात होणाऱ्या दोन दिवसाच्या पावसाळी अधिवेशनावरुन देखील राणेंनी सरकारवर टीका केली आहे. ‘लोकसभेचं अधिवेशन हे 19 जुलै ते 13 ऑगस्टपर्यंत होऊ शकतं. मग महाराष्ट्राचं अधिवेशन फक्त दोन दिवसाचं का?’
‘एक लाख तीस हजार लोक हे कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. मात्र त्याची चर्चा सभागृहात नाही. त्याबाबत अजिबात गांभीर्य नाही. मुख्यमंत्री हे याबाबत गंभीर नाहीत. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांचे अजून पैसे दिले नाहीत. असा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या इतिहासात झाला नाही जो कॅबिनेटला देखील जात नाही.’ असं म्हणत राणेंनी ठाकरे सरकारवर अक्षरश: टीकेचा भडीमार केला.
Vidhansabha Session : भाजपला झटका! अध्यक्षांशी गैरवर्तन केल्याने 12 आमदारांचं वर्षभरासाठी निलंबन
नारायण राणेंच्या या टीकेनंतर आता शिवसेना त्यांना नेमकं काय उत्तर देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या टीकेमुळे राणे आणि शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा जुंपण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT