दापोलीच्या वणोशीत तीन वृद्ध महिलांचा संशयास्पद मृत्यू, अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळले मृतदेह
राकेश गुडेकर, प्रतिनिधी, दापोली दापोली तालुक्यातील वणोशी खोतवाडी येथे एकाच घरातील तीन वृद्ध महिलांचा जळून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी समोर आली आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ माजली असून, दापोली पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. दापोली पालगड रोडवरील वणोशी या गावामध्ये खोतवाडी आहे. या वाडी मध्ये सुमारे पस्तीस घरे आहेत. यातील बहुतांशी घरे ही […]
ADVERTISEMENT
राकेश गुडेकर, प्रतिनिधी, दापोली
ADVERTISEMENT
दापोली तालुक्यातील वणोशी खोतवाडी येथे एकाच घरातील तीन वृद्ध महिलांचा जळून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी समोर आली आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ माजली असून, दापोली पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. दापोली पालगड रोडवरील वणोशी या गावामध्ये खोतवाडी आहे. या वाडी मध्ये सुमारे पस्तीस घरे आहेत. यातील बहुतांशी घरे ही बंद अवस्थेत आहेत.
या ठिकाणी असलेले बहुतांश ग्रामस्थ हे कामा धंद्यानिमित्त मुंबईत स्थलांतरित झालेले आहेत, त्यामुळे गावांमध्ये केवळ चार ते पाच कुटुंबच वास्तव्याला आहेत. गावातच एका घरामध्ये सत्यवती पाटणे (वय- 75), पार्वती पाटणे (वय – 90) या वृद्ध महिला राहत होत्या त्यांच्या समोरच्या घरात त्यांच्या नातेवाईक इंदुबाई पाटणे (वय – 85) या राहायला होत्या. सध्या दापोलीत थंडीचे दिवस असल्याने त्या घराची दारं खिडक्या बंद करून राहत असत, मात्र दररोज सकाळी त्या उन्हामध्ये बसत असत. त्यांच्या घराच्यासमोर त्यांचे कुलदैवतेचं मंदिर आहे. तेथे पूजा करण्याकरिता विनायक पाटणे हे दररोज सकाळी येतात त्यांना शुक्रवारी सकाळी या महिला बाहेर उन्हामध्ये बसलेल्या दिसल्या नाहीत.
हे वाचलं का?
एवढंच नाही तर त्यांना मंदिराची किल्ली देखील हवी होती, म्हणून ते किल्ली मागण्यांकरिता या महिलांच्या घरामध्ये गेले. मात्र आतून काही प्रतिसाद आला नाही मग त्यांनी घराच्या मागील बाजूचा दरवाजा लोटून पाहिला असता तो त्यांना उघडा असलेला आढळून आला, त्यांनी तो लोटून पहिला यांनी ही बाब ग्रामस्थांना सांगितली ग्रामस्थांना सांगितल्यावर ग्रामस्थांनी येऊन खातरजमा केली असता, घरामध्ये तीन खोल्यांमध्ये तीन महिला मृतावस्थेत आढळून आल्याचे त्यांना दिसून आले त्यांनी ही घटना तातडीने त्यांचे मुंबईतील नातेवाईक यांना कळवली. हे नातेवाईक शुक्रवारी सायंकाळी मुंबईतून दापोलीत दाखल झाले. त्यानंतर दापोली पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे हे देखील आपल्या अधिकार्यां समवेत शुक्रवारी सायंकाळी घटनास्थळी रवाना झाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद करण्याचे काम पोलीस स्थानकात सुरू होते या महिला ज्या घरांमध्ये मृतावस्थेत आढळून आल्या, त्या घराचा पुढील दरवाजा का बंद होता आणि मागील दरवाजा उघडा होता. त्यातील सत्यवती पाटणे या पडवीमध्ये चुलीच्या जवळ मृतावस्थेत जळलेल्या अवस्थेत आढळून आल्या, त्यांचे डोके फुटून त्यातून बरेच रक्त देखील वाहून गेल्याचे दिसून येत होते. शिवाय पार्वती पाटणे या अनेक वर्ष जागेवरच असल्याने त्या दुसऱ्या खोलीमध्ये जळलेल्या अवस्थेमध्ये आढळून आल्या. इंदुबाई पाटणे या त्यांच्या समोरच्या घरात राहणाऱ्या त्यांच्या दुसऱ्या नातेवाईक होत्या त्या या दोन महिलांच्या घरातील हॉलमध्ये मृतावस्थेत आढळून आल्या. शिवाय या घराचा दरवाजा आतल्या बाजूने बंद होता यामुळे संशय व्यक्त करण्यात येत आहे. दापोली पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT