Afghanistan ची सत्ता काबीज करताच तालिबानींची आईसक्रीम पार्टी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

तालिबानने अफगाणिस्तानमध्ये सत्ता काबीज केली आहे. अफगाणिस्तानमध्ये लोक दहशतीत आहेत. अशात तालिबानी मुलांचे फोटो व्हायरल होत आहेत. त्यातले काही फोटो पाहून तुम्हाला हसू येईल

हे वाचलं का?

ट्रॅफिक हवालदाराप्रमाणेच एक माणूस या फोटोत रस्त्यात उभा आहे त्याच्या खांद्यावर AK 47 रायफल आहे. सोशल मीडियावर अफगाणिस्तानचा नवा ट्रॅफिक इन्स्पेक्टर असं त्याला संबोधलं जातं आहे.

ADVERTISEMENT

आणखी एक फोटो व्हायरल होतो आहे ज्यामध्ये तालिबानी एका ऑफिसमध्ये बसलेले दिसत आहेत. ऑफिसच्या भिंतीवर AK 47 रायफलही टांगललेली दिसते आहे. या फोटोचीही नेटकऱ्यांनी खिल्ली उडवली आहे.

ADVERTISEMENT

अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर हे तालिबानी तरूण आईसक्रीम पार्टी करताना दिसत आहेत हा फोटो चांगलाच व्हायरलही झाला आहे

काही व्हीडिओही व्हायरल झाले आहेत तिथे तालिबानी युवक काबूलच्या अॅम्युझमेंट पार्कमध्ये घुसले आणि काही लोक इलेक्ट्रिक कार चालवत आहेत. तर काहीजण वर्क आऊट करत आहेत.

एका फोटोत काबूलच्या संसदेत तालिबानी युवक हत्यार घेऊन उभा आहे. हा फोटोही चांगलाच व्हायरल झाला आहे. इथे शासन आता बंदुकीच्या टोकावर चालणार असं आता नेटकरी म्हणत आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT