काबूल: पाकिस्तानविरोधी रॅली काढणाऱ्या महिलांवर तालिबान्यांचा गोळीबार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

काबूल: तालिबानने (Taliban)पुन्हा एकदा अफगाणिस्तानात (Afghanistan)आपल्या क्रूरतेचे प्रदर्शन केलं आहे. काबूलमध्ये पाकिस्तानविरोधी रॅली काढलेल्या जमावाला पांगवण्यासाठी तालिबान्यांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. मंगळवारी (7 सप्टेंबर) काबूलच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात पाकिस्तानविरोधी निदर्शने (Anti Pakistan Protest) करण्यात आली.

ADVERTISEMENT

दरम्यान, या गोळीबारात किती जणांचा मृत्यू झालाय किंवा किती जण जखमी झाले आहेत याबाबत नेमकी माहिती अद्याप तरी मिळू शकलेली नाही. मात्र, तालिबान्यांनी केलेल्या या कृत्याविरोधात संपूर्ण अफगाणिस्तानसह जगभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

स्थानिक मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, तालिबानच्या जवानांनी काबूलमधील राष्ट्रपती पॅलेसजवळ अंदाधुंद गोळीबार केला. कारण येथे मोठ्या संख्येने आंदोलक मोर्चासाठी जमा झाले होते. असं म्हटलं जात आहे की, राष्ट्रपती पॅलेसजवळ काबूल सेरेना हॉटेल आहे. याच हॉटेलमध्ये पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI चे प्रमुख गेल्या एक आठवड्यापासून मुक्काम करत आहेत.

हे वाचलं का?

दरम्यान, या आंदोलनाचं कव्हरेज करण्यासाठी गेलेल्या पत्रकार आणि कॅमेरामन यांनाही तालिबान्यांनी अटक केली असल्याची माहिती समजते आहे.

अफगाणिस्तानमध्ये गेल्या एक-दोन दिवसांपासून पाकिस्तानविरोधात सातत्याने निदर्शने सुरू आहे. अफगाण नागरिक पाकिस्तानकडून पंजशीरमध्ये झालेल्या हल्ल्याचा निषेध करत आहेत.

ADVERTISEMENT

पाकने पंजशीरमध्ये ड्रोन हल्ला केला

ADVERTISEMENT

पंजशीरमध्ये पाकिस्तानी हवाई दलाने उत्तर आघाडीच्या वेगवेगळ्या ठिकाणांवर ड्रोन हल्ले केले. ज्याचा फायदा तालिबानला झाला. त्यामुळेच अफगाणिस्तानच्या नागरिकांचा पाकिस्तानबाबतचा संताप उफाळून आला आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून काबूलच्या मजार-ए-शरीफमध्ये पाकिस्ताविरोधात आंदोलन सुरू आहे. विशेष गोष्ट अशी आहे की, या आंदोलनात महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.

केवळ अफगाणिस्तानच नव्हे तर अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमध्ये राहणाऱ्या अफगाण नागरिकांनी देखील व्हाईट हाऊससमोर पाकिस्तानविरोधात निदर्शने केली. या लोकांनी पाकिस्तानवर निर्बंध आणण्याची मागणी केली आहे.

Who is Taliban: तालिबानी कोण आहेत, काबूल ताब्यात घेतल्याने संपूर्ण जगाला का भरली आहे धडकी?

विशेष म्हणजे पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचे प्रमुख फैज हमीद हे गेल्या काही दिवसांपासून काबूलमध्ये आहेत. काबूलमधील तालिबान-हक्कानी नेटवर्कशी समन्वय साधण्यासाठी आणि सरकार स्थापनेची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ते येथे आले आहेत. ज्याला स्थानिक लोक विरोध करत आहेत.

अफगाणिस्तानात सत्तेसाठी तालिबान्यांमध्येच संघर्ष

दुसरीकडे अफगाणिस्तानमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी तालिबानमधील अंतर्गत गटबाजी समोर येत आहे. यामध्ये तीन मुख्य नावे आहेत. मुल्ला अब्दुल गनी बरदार, हिबतुल्ला अखुंदजादा आणि सिराजुद्दीन हक्कानी. रिपोर्टनुसार, मुल्ला बरदार आणि सिराजुद्दीन हक्कानी यांच्यात सरकार स्थापनेवरुन खूप तणाव आहे. तसेच याशिवाय इतरही काही कारणे आहेत ज्यामुळे अफगाणिस्तानमध्ये सरकार स्थापनेमध्ये अडथळे येत आहेत.

1994 साली तालिबानची स्थापना करणाऱ्या चार लोकांमध्ये मुल्ला अब्दुल गनी बरदार यांचेही नाव होते. 2001 मध्ये, जेव्हा अमेरिकेने अफगाणिस्तानात तालिबानला सत्तेतून बेदखल केले होते तेव्हा मुल्ला बरादर हा तालिबान्यांचा प्रमुख नेता होता. त्यामुळे सध्या तालिबान्यांमध्ये बरादर याचा शब्दाला बरंच वजन आहे.

मात्र, हक्कानी नेटवर्कचे नेते सिराजुद्दीन हक्कानी यांना कोणासोबतही सत्ता वाटून घ्यायची नाही. हक्कानी नेटवर्क हे तालिबानसोबत असूनही, अफगाणिस्तानमध्ये एक जबरदस्त वर्चस्व असणारा गट आहे. दुसरीकडे हक्कानी नेटवर्कला पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचाही पाठिंबा असल्याचं समजतं आहे. त्यामुळे अफगाणिस्तानची सत्ता नेमकी कोणाच्या ताब्यात जाते याकडे अफगाणिस्तानच्या जनतेचं लक्ष आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT