Tanmay Fadnavis ने आरोग्य कर्मचारी म्हणून घेतली लस, माहितीच्या अधिकारात माहिती उघड
देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे तन्मय फडणवीस यांनी आरोग्य कर्मचारी म्हणून कोरोनाची लस घेत्याची माहिती माहितीच्या अधिकारात उघड झाली आहे. बारामतीतले माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी ही माहिती उघड केली आहे. त्यामुळे आता तन्मय फडणवीस यांचं लसीकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. तन्मय फडणवीस हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे आहेत. त्यांनी लस […]
ADVERTISEMENT
देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे तन्मय फडणवीस यांनी आरोग्य कर्मचारी म्हणून कोरोनाची लस घेत्याची माहिती माहितीच्या अधिकारात उघड झाली आहे. बारामतीतले माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी ही माहिती उघड केली आहे. त्यामुळे आता तन्मय फडणवीस यांचं लसीकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. तन्मय फडणवीस हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे आहेत. त्यांनी लस घेतल्यानंतरचा फोटो त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला होता. मात्र यावरून वाद निर्माण होताच त्यांनी तो फोटो डिलिट केला होता. मात्र त्यांनी लस घेतानाच्या फोटोचे स्क्रिनशॉट व्हायरल झाले होते आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकाही झाली होती.
ADVERTISEMENT
बारामती तालुक्यातील सोमेश्वर परिसरातील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी याबाबत मुंबईतल्या सेव्हन हिल्स हॉस्पिटल कडे माहिती मागवली होती. त्यानुसार हॉस्पिटल प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहिती नुसार तन्मय फडणवीस यांनी 13 मार्च ला कोविड प्रतिबंधक लस घेतली असून रजिस्टर ला हेअल्थकेअर वर्कर अशी नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, तन्मय हा आरोग्य कर्मचारी असल्याची नोंद कुठेही आढळत नाही. मुळात तन्मय याच्या ट्वीटर हँडलवर तन्मय याने ऍक्टर असा उल्लेख केला आहे. त्यामुळे तन्मय चे लसीकरण वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
हे वाचलं का?
देशात 1 मे पासून 18 ते 44 या वयोगटाचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. त्याआधी आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स तसेच 60 वर्षांवरील नागरिक आणि 45 ते 60 या वयोगटातील सहव्याधीग्रस्त नागरिक यांच्या लसीकरणास परवानगी देण्यात आली होती. असे असताना तन्मय फडणवीस यांनी 1 मेच्या आधीच 13 मार्चला लसीकरणाचा डोस घेतल्याचे स्पष्ट झाले होते. तन्मय याने पहिला डोस मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात तर दुसरा डोस नागपूर येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युट येथे घेतला होता. 20 एप्रिल रोजी एक फोटो व्हायरल झाल्याने ही बाब पुढे आली होती. त्यावरून बराच वाद निर्माण झाला होता.
ADVERTISEMENT
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने यावर तीव्र आक्षेप घेत चौकशीची मागणी केली होती. त्याचवेळी देवेंद्र फडणवीस यांनी तन्मय हा दूरचा नातेवाईक असल्याचे सांगत त्याने लस नेमकी कशी घेतली हे आपणास माहीत नसल्याचे सांगितले होते. मात्र, माजी मंत्री शोभा फडणवीस यांचे नातू आणि देवेंद्र फडणीस यांचे पुतणे तन्मय याने राजकीय वशिला वापरून लसीकरण करून घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. या सर्व पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आता याबाबत देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा प्रश्न विचारला जाणार हे निश्चित आहे. त्याबाबत ते काय स्पष्टीकरण देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT