Tauktae Cyclone : कोकणात घरांचं नुकसान, अनेक ठिकाणी रस्ते बंद

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

तौकताई वादळाचा कोकण किनारपट्टीला जोरदार फटका बसलाय. तळकोकणात सिंधुदुर्ग आणि मालवण मध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांवर झाडं उन्मळून पडलेली पहायला मिळाली.

हे वाचलं का?

रस्त्याच्या लगत असलेली अनेक झाडं सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पडल्यामुळे असं धोकादायक चित्र निर्माण झालं होतं.

ADVERTISEMENT

रस्त्यांवर पडलेली झाडं आणि अन्य कचरा साफ करताना कर्मचारी

ADVERTISEMENT

सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी बैठ्या घरांवर झाडं कोसळली, ज्याचा फटका अनेकांना बसलेला पहायला मिळाला.

झाड कोसळून झालेलं घराचं नुकसान…

रस्त्याच्या कडेला ठेवलेली वाहनंही या चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडली.

ताशी ६० ते ७० च्या वेगाने वाहत असलेल्या वाऱ्यांमुळे अनेक भागांत घरांवरचे पत्रे उडून गेले.

सावंतवाडी येथे घाटातला रस्ता पावसामुळे असा खराब झाला. वादळाचं संकट गेल्यानंतर प्रशासनाला अशा प्रकारे झालेलं रस्त्याचं नुकसान दुरुस्त करणं क्रमप्राप्त होणार आहे.

सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे छत कोसळून झालेलं नुकसान

चक्रीवादळामुळे वाऱ्याचा वेग इतका मोठा होता की प्रवासी बसही रस्त्यात अशी उलटून पडली.

विजेच्या खांबावर मोठमोठे वृक्ष कोसळून अनेक भागांमधला वीजपुरवठा खंडीत झाला आहे.

झाडं कोसळल्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते बंद झाले होते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT