Tauktae Cyclone Effect : मोडून पडला संसार…कोकणात वादळाने होत्याचं नव्हतं केलं
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानंतर तयार झालेल्या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात दोन दिवस गंभीर परिस्थिती निर्माण झाली. विशेषकरुन कोकणात सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याला या चक्रीवादळाचा फटका बसला. आता हे चक्रीवादळ गुजरातमध्ये दाखल झालं असून कोकणवासिय या चक्रीवादळाने दिलेल्या तडाख्यातून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतायत. सिंधदुर्ग, मालवण, कुडाळ, रत्नागिरी अशा अनेक ठिकाणी चक्रीवादळाचा फटका बसला. सोसाट्याचा वारा […]
ADVERTISEMENT
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानंतर तयार झालेल्या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात दोन दिवस गंभीर परिस्थिती निर्माण झाली. विशेषकरुन कोकणात सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याला या चक्रीवादळाचा फटका बसला. आता हे चक्रीवादळ गुजरातमध्ये दाखल झालं असून कोकणवासिय या चक्रीवादळाने दिलेल्या तडाख्यातून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतायत.
ADVERTISEMENT
सिंधदुर्ग, मालवण, कुडाळ, रत्नागिरी अशा अनेक ठिकाणी चक्रीवादळाचा फटका बसला. सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे अनेक ठिकाणी मोठमोठी झाडं कोसळली तर काही ठिकाणी लोकांच्या घरावरली छपरं उडून गेली. शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी आज नुकसानग्रस्त भागाचा दौरा करत, नुकसानीचे पंचनामे करत नागरिकांना तात्काळ मदत मिळवून देण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले.
हे वाचलं का?
मालवण तालुक्यात किनारपट्टी भागात या वादळाने मोठं नुकसान केलं. स्थानिकांच्या घरावर मोठी झाडं पडल्यामुळे राहत्या घरातून बाहेर पडायची वेळ काही लोकांवर आली. याचसोबत सोसाट्याच्या वाऱ्यामुळे विजेचे खांब निखळून पडल्यामुळे अनेक भाग गेल्या दोन दिवसांपासून अंधारातच आहेत. एकट्या मालवण तालुक्यात ४५० विजेचे खांब कोसळल्यामुळे इथल्या नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे.
ADVERTISEMENT
याव्यतिरीक्त देवबाग, तारकर्ली, वायरी, मालवण शहर, तोंडवळी, तळाशील, आचरा यासारख्या भागांतही चक्रीवादळामुळे घरांचं नुकसान झालं. आमदार वैभव नाईक यांनी आपल्या पाहणी दौऱ्यादरम्यान पालकमंत्री उदय सामंत आणि मुख्यमंत्री कार्यालयामार्फत नुकसानग्रस्तांना वेळेत योग्य ती मदत मिळवून देण्याचं आश्वासन दिलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT