Tauktae Cyclone : मुंबईतला Sea Link पुढील सूचना मिळेपर्यंत बंद
मुंबईतला वांद्रे-वरळी सी लिंक (Sea Link ) अर्थात सागरी सेतू हा पुढील सूचना मिळेपर्यंत बंद राहणार आहे. मुंबई महापालिकेने ट्विट करून तशी माहिती दिली आहे. वांद्रे-वरळी सी लिंक वापरणाऱ्यांनी तिथे जाऊ नये, पर्यायी मार्गांचा वापर करावा असं मुंबई महापालिकेने म्हटलं आहे. एवढंच नाही तर गरज नसल्यास मुळीच घराबाहेर पडू नका असंही मुंबई महापालिकेने म्हटलं आहे. […]
ADVERTISEMENT
मुंबईतला वांद्रे-वरळी सी लिंक (Sea Link ) अर्थात सागरी सेतू हा पुढील सूचना मिळेपर्यंत बंद राहणार आहे. मुंबई महापालिकेने ट्विट करून तशी माहिती दिली आहे. वांद्रे-वरळी सी लिंक वापरणाऱ्यांनी तिथे जाऊ नये, पर्यायी मार्गांचा वापर करावा असं मुंबई महापालिकेने म्हटलं आहे. एवढंच नाही तर गरज नसल्यास मुळीच घराबाहेर पडू नका असंही मुंबई महापालिकेने म्हटलं आहे. खरंतर शनिवारीच या संदर्भातली माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली होती. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईला चक्रीवादळाचा धोका नाही पण आपण खबरदारी घेत आहोत असंही त्यांनी म्हटलं होतं. पण मुंबईत पावासचा जोर वाढला आहे. त्यामुळे वांद्रे-वरळी सी लिंक हा पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
Cyclone म्हणजे काय? त्यांना नावं नेमकी कशी दिली जातात?
महाराष्ट्राला (Maharashtra) सध्या कोरोनासोबतच (Corona) ‘तौकताई’ या चक्रीवादळाचा (Tauktae Cyclone) देखील सामना करत आहे. अरबी समुद्रात (Arabian Sea) कमी दाबाच्या पट्टा तयार झाल्याने या वादळाची निर्मिती झाली आहे. (Cyclone) कालपासून (16 मे) हे वादळ महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात घोंघावत आहे. त्यामुळे या वादळाचा बराच फटका गोव्यासह कोकण किनारपट्टी भागाला बसला आहे. सध्या या वादळाने मुंबईत एंट्री केली असून आता ते पालघर-डहाणूमार्गे थेट गुजरातमध्ये जाऊन धडकणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
हे वाचलं का?
तौकताई हे वादळ आज (17 मे) सकाळी 7 वाजेच्या सुमारास मुंबईपासून आत 150 किमी खोल समुद्रात पोहचलं आहे. या चक्रीवादळामुळे मुंबईत सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस बरसत असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच तुफान वेगाने वारा देखील वाहत आहे.
Tauktae Cyclone: चक्रीवादळाने दिशा बदलली, पाकिस्तानवर धडकणारं वादळ आता महाराष्ट्रातून गुजरातच्या दिशेने!
ADVERTISEMENT
तौकताई वादळाचा प्रवास हा लांबवरचा असल्याने महाराष्ट्रतील जवळजवळ सर्वच किनारपट्टी भागातून त्याची वाटचाल झाली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातून हे वादळ पुढे सरकून आज (17 मे) पहाटे 2 वाजेच्या सुमारास रायगड (Raigad) जिल्ह्यात पोहचलं. त्यामुळे श्रीवर्धन (Shrivardhan), हरिहरेश्वर (Harihareshwar), दिवे-आगार या किनारपट्टी भागात जोरदार वारे वाहत होते.
ADVERTISEMENT
दरम्यान, गेल्या वर्षी आलेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा (Nisarga Cyclone) लँडिंग पॉईंट हा रायगड जिल्ह्यातच होता. त्यामुळे येथे प्रचंड नुकसान झालं होतं. या नुकसानात येथील नागरिक अद्याप सावरलेले देखील नाहीत तोच आता तौकताई चक्रीवादळाचा त्यांना फटका बसला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT