Tauktae cyclone: एका रात्रीत मुंबईतील कोव्हिड सेंटरमधील ‘एवढ्या’ रुग्णांना हलवलं दुसरीकडे

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: अरबी समुद्रात (Arabian Sea) घोंघावत असलेल्या तौकताई चक्रीवादळामुळे (Tauktae cyclone) वाहणारे वादळी वारे व जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून, मुंबईतील (Mumbai) दहिसर, वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) आणि मुलुंड येथील भव्य कोव्हिड आरोग्य केंद्रांतील (Covid Center) मिळून एकूण 580 कोव्हिड बाधित रुग्णांचे महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये काल रात्रीच (15 मे) सुरक्षितपणे स्थलांतर करण्यात आले.

ADVERTISEMENT

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत काल (15 मे ) सायंकाळी या रुग्ण स्थलांतर कार्यवाहीबाबत नियोजन व आढावा बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे घेण्यात आली. यावेळी इतर यंत्रणांचे प्रतिनिधीही सहभागी झाले होते.

अतिरिक्त आयुक्त काकाणी यावेळी म्हणाले की, ‘तौकताई चक्रीवादळामुळे मुंबईत ताशी सुमारे 60 ते 80 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून सोबत जोरदार पाऊसही कोसळू शकतो. चक्रीवादळाचा मुंबई महानगराला थेट धोका नसला तरी मुंबई किनाऱ्याला लागून ते जात असल्याने, वादळीवारे व मुसळधार पावसाची शक्यता पाहता, खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कोव्हिड रुग्णांचे सुरक्षित स्थलांतर केले जात आहे.’

हे वाचलं का?

Tauktae Cyclone : मुंबईकरांनो घराबाहेर पडणं टाळा, महापालिकेकडून यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश

‘प्रामुख्याने तीन भव्य (जंबो) कोव्हिड आरोग्य केंद्रांतील मिळून 580 रुग्णांना इतर रुग्णालयांमध्ये काल रात्रीच सुरक्षितपणे स्थलांतरित करण्याची कार्यवाही सुरु करण्यात येत आहे. यामध्ये दहिसर कोव्हिड केंद्रातील 183, वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) कोव्हिड केंद्रातील 243 आणि मुलुंड कोव्हिड केंद्रातील 154 रुग्णांचा समावेश आहे. यात अतिदक्षता उपचार, ऑक्सिजन पुरवठा या वर्गवारीप्रमाणे स्थलांतर करताना ऑक्सिजन पुरवणारे सिलेंडर्स, सुसज्ज रुग्णवाहिका, आवश्यकता भासल्यास इंजेक्शन व इतर संयंत्रांसह रुग्णांना सुरक्षितपणे स्थलांतरित करण्याचे निर्देश काकाणी यांनी यावेळी दिले.

ADVERTISEMENT

कोणता रुग्ण कोणत्या रुग्णालयात स्थलांतरित करण्यात आला, त्यासाठी रुग्णवाहिका व इतर आवश्यक वैद्यकीय संयंत्रे व सामुग्री उपलब्ध आहे का, यासह विविध तपशीलवार कार्यवाही करण्यासाठी रुग्णालय निहाय समन्वय अधिकारी तात्काळ नेमण्याचे निर्देशही काकाणी यांनी तीनही कोव्हिड केंद्रांना दिले होते.

ADVERTISEMENT

Tauktae Cyclone: पाहा महाराष्ट्रात कोणत्या वेळी कुठे असणार चक्रीवादळ?

रुग्ण स्थलांतरित करण्यात आल्यानंतर त्याबाबतची माहिती त्यांच्या नातेवाईकांना कळवावी ज्या रुग्णालयात प्रत्यक्ष स्थलांतर केले आहे, तिथे आवश्यक ती सर्व व्यवस्था उपलब्ध आहे. याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे, तसेच प्रत्यक्ष स्थलांतर सुरु करताना वाहतूक पोलिसांसमवेत आवश्यक तो समन्वय साधावा, अशा सूचनाही काकाणी यांनी केल्या होत्या.

मुंबईकरांनो घराबाहेर पडणं टाळा

1. हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज पाहता नागरिकांनी घराबाहेर पडणं टाळावं असं आवाहन पालिकेने केलं आहे.

2. मुंबईतील चौपाट्या आणि समुद्रकिनाऱ्या लगतच्या भागामध्ये नागरिकांनी जाऊ नये यासाठी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या योग्य ती कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

3. भारतीय हवामान खात्याने दिलेला इशारा पाहता, वरळी-वांद्रे प्रकल्पाला जोडणाऱ्या सागरी सेतूवरील वाहतूक सुरु ठेवायची की नाही हा निर्णय परिस्थिती पाहून घेतला जाईल.

4. मुंबई परिसरातील धोकादायक वृक्षांची छाटणी करण्याच्या कामाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.

5. याव्यतिरीक्त मुंबईत जे होर्डिंग्ज धोकादायक परिस्थितीत आहेत ते ताबडतोक हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रेल्वेच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या असून दोन्ही उपनगरीय लोकल सेवा सुरु राहणार आहेत.

6. मुंबई मेट्रो, रस्ते विभाग, MMRDA अशा विभागांकडून सुरु असलेल्या पायाभूत सोयी-सुविधांच्या कामात आवश्यक खबरदारीचे उपाय आणि बॅरिकेटींग करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

7. मुंबईत वीजपुरवठा करणाऱ्या कंपन्यांनाही या काळात सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले असून वीजपुरवठा खंडीत झाल्यास तो वेळेत पूर्ववत सुरु होईल याची काळजी घेण्यात आली आहे.

8. याचसोबत मुंबईत समुद्रकिनाऱ्यावर राहत असलेल्या लोकांना आवश्यकतेनुसार अन्यत्र स्थलांतरित करण्यात येणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT