गोपीनाथ मुंडे आणि प्रीतम मुंडेंच्या प्रश्नावर उत्तर देताना पंकजा मुंडेंच्या डोळ्यात पाणी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नरेंद्र मोदी मंत्रिमंडळ विस्तार हा गेल्या दोन दिवसांपासून चर्चेत आहे. या विस्तारात बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद मिळालं नाही त्यामुळे मुंडे भगिनी नाराज असल्याच्या जोरदार चर्चा होत्या. मात्र पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन या सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला. पत्रकारांनी जेव्हा पंकजा यांना प्रीतम मुंडे आणि गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत प्रश्न विचारला तेव्हा त्यांच्या डोळ्यात वडिलांच्या आठवणीने अश्रू उभे राहिले.

ADVERTISEMENT

प्रीतमताई लोकसभेला निवडून आल्या. मला वाटत मुंडे साहेब जेव्हा निवडून आले तेव्हा मी एकटीच होते, आमचा एकही आमदार नव्हता, माझ्या पायाला फोड आले होते, मी पट्ट्या बांधून पक्षाचा प्रचार केला हे सगळं आम्ही पक्षासाठीच केलं. असं सांगत असतान पंकजा मुंडे यांच्या डोळ्यात पाणी तराळलं. त्यांना जेव्हा हे विचारण्यात आलं की तुम्ही भावूक का झालात तेव्हा गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीने मी भावूक झाले असं त्यांनी सांगितलं.

प्रीतमताई निवडणुकीला ज्या उभ्या राहिल्या त्या बापाच्या मृत्यूनंतर उभ्या राहिल्या. त्यामुळे त्या रेकॉर्डब्रेक करणार होत्या. पण आता जी निवडणूक त्या जिंकल्या त्या त्यांच्या मेरीटवर जिंकल्या. तरीही ती प्रीतमताई निवडणुकीच्या उमेदवार राहणार नाहीत, अशा चर्चा होत्या. आम्ही जे कष्ट केलेत ते पक्षासाठी केलेत. माझ्याकडे येणारी गर्दी पक्षासाठी आहे ती वेगळी आहे, असं कोणी म्हणत असेल तर मी मात्र तसं म्हणणार नाही. पक्षामध्ये जे अ‌ॅडिशन झालं त्यामुळे एक जर मत वाढलं तरी ते समाधानाची बाब आहे, असं पंकजा मुंडे हे सर्व सांगत असताना गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीनं भावूक झाल्या होत्या.

हे वाचलं का?

विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुका झाल्या त्यावेळी नवनवी लोकं आली आहेत त्यामुळे पक्षाची ताकद वाढेल असं नेत्यांना वाटतं असेल तर त्या भावनेचा सन्मान करणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितलं. मी भारतीय जनता पार्टीच्या संस्कृतीला सन्मान देणारी कार्यकर्ता आहे. पक्षनिष्ठा ही माझ्या बापानं मला संस्कारात दिली आहे. अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी केंद्रात नेतृत्त्व करत होते. त्यावेळी मुंडे महाजन राज्यात नेतृत्व करत होते. आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांची संस्कृती काढणं आमच्या संस्कृतीत बसत नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. तुम्ही देवेंद्र गटात नाही म्हणून तुमच्या बहिणीला मंत्रिपद मिळालं नाही का असं विचारलं असता मी भाजपची कार्यकर्ती आहे आणि आमच्या पक्षात देवेंद्र गट किंवा नरेंद्र गट असे कोणतेही गट नाहीत असंही त्यांनी सांगितलं.

मी आणि प्रीतम मुंडे नाराज नाही. चुकीच्या बातम्या पेरल्या गेल्या, असं सांगत पंकजा यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला. तसेच मंत्रिपदासाठी प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा सुरू होती. ते योग्यच होतं, असं सूचक वक्तव्यही त्यांनी केलं.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT