मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केसीआर आज भेटणार, भाजपविरुद्ध आघाडीच्या राजकारणाला वेग

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

केंद्रातील भाजप सरकारविरुद्ध विरोधी पक्षांनी एकत्र येण्याच्या चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरु आहेत. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी, महाराष्ट्रात शरद पवार यांनी याआधी भाजपविरुद्ध विरोधी पक्षांची आघाडी बनवण्याबद्दल बोलून दाखवलं होतं. यानंतर आज या दिशेने आणखी एक पाऊल टाकलं जात आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज बैठक होणार आहे. दुपारी १ वाजता मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव वर्षा या उद्धव ठाकरेंच्या सरकारी निवासस्थानी त्यांची भेट घेतील.

ADVERTISEMENT

देशात बिगर भाजपशासित राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एकत्र आणण्याची जबाबदारी चंद्रशेखर राव यांनी घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून चंद्रशेखर राव यांनी केंद्र सरकारच्या ध्येय धोरणांवर जाहीरपणे टीका करत सरकारला आव्हान दिलं होतं. त्यामुळे आजच्या बैठकीत आगामी काळात भाजपविरुद्ध समविचारी पक्षांना एकत्र आढून पुढील राजकारणाची दिशा कशी असेल याबद्दल चर्चा होऊ शकते असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.

…तर २०२३ ची निवडणुक काँग्रेससाठी शेवटची असेल; दिग्विजय सिंह यांच्या काँग्रेसला कानपिचक्या

हे वाचलं का?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर चंद्रशेखर राव दुपारी चार वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेणार आहेत. त्यामुळे चंद्रशेखर राव यांच्या आजच्या दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे. मध्यंतरी चंद्रशेखर राव यांनी भाजपविरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज बोलून दाखवल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राव यांच्यात फोनवरुन चर्चा झाली होती. त्यामुळे आजच्या बैठकीत नेमकं काय समोर येतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT