मुंबईची चिंता वाढली ! दिवसभरात ३ हजार ६२ नवे कोरोना रुग्ण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर असलेल्या महाराष्ट्र सरकारसमोरच्या चिंता काहीकेल्या कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत. आज दिवसभरात मुंबई शहरात ३ हजार ६२ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. १० रुग्णांना कोरोनामुळे मृत्यू झाला असून महापालिका प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महापालिका प्रशानस शहरात निर्बंध अधिक कडक करण्याच्या विचारात आहे.

ADVERTISEMENT

मुंबईकरांनो Mall मध्ये जाण्याचा प्लान करताय? मग ही बातमी वाचाच !

याचाच एक भाग म्हणून, महापालिका प्रशासनाने गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे मुंबईतील मॉलमध्ये Rapid Antigen Test केंद्र सुरु करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. “मुंबईत कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने चिंताजनक वाढ होते आहे. २२ मार्चपासून मुंबईतील प्रत्येक मॉलमध्ये स्वॅब कलेक्शन सेंटर आणि रॅपिड अँटिजेन टेस्ट Facility सुरु करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. मॉलच्या व्यवस्थापनापैकी एक टीम या कामासाठी नेमावी लागणार आहे. याविषयी अधिकचं प्लानिंग आम्ही करत आहोत.” महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी ‘इंडिया टुडे’शी बोलताना माहिती दिली.

हे वाचलं का?

उद्धव ठाकरे म्हणतात, लॉकडाउनचा पर्याय आहे पण…

एकीकडे शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना महापालिकेने लसीकरणाची मोहीम अधिक तीव्र करण्याचा विचार केला आहे. मुंबईत दररोज किमान १ लाख नागरिकांना लस देण्याचं उद्दीष्ट महापालिका प्रशासनाने ठेवलं आहे. यासाठी मुंबईत लसीकरणासाठी खासगी हॉस्पिटलची संख्या ५९ वरुन ८० पर्यंत नेण्यासाठी महापालिका प्रशासन केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी स्थानिक नगरसेवक, सेवाभावी संस्था यांची मदत घेतली जाणार आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी यासदंर्भातले आदेश दिले आहेत. त्यामुळे आगामी काळात मुंबईतील रुग्णसंख्या वाढीचा वेग नियंत्रणात आणण्यात पालिका प्रशासनाला यश येतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT