NIA करणार मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास, जाणून घ्या आज कोर्टात काय घडलं?
मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा तपासही आता NIA कडे वर्ग करण्यात आला आहे. ठाणे सत्र न्यायालयात आज यासंदर्भात सुनावणी झाली. केंद्रीय गृहमंत्रालयाने मनसुख यांच्या मृत्यूचा तपास NIA कडे सोपवण्याचे आदेश दिले होते. परंतू यानंतरही ATS चे अधिकारी या प्रकरणातली कागदपत्र NIA कडे सोपवत नव्हते. अखेरीस NIA ने ठाणे […]
ADVERTISEMENT
मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा तपासही आता NIA कडे वर्ग करण्यात आला आहे. ठाणे सत्र न्यायालयात आज यासंदर्भात सुनावणी झाली. केंद्रीय गृहमंत्रालयाने मनसुख यांच्या मृत्यूचा तपास NIA कडे सोपवण्याचे आदेश दिले होते. परंतू यानंतरही ATS चे अधिकारी या प्रकरणातली कागदपत्र NIA कडे सोपवत नव्हते. अखेरीस NIA ने ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला. ज्यावर झालेल्या सुनावणीत न्यायालयाने महाराष्ट्र एटीएसला मनसुख प्रकरणाचा तपास थांबवून सर्व कागदपत्र आणि पुरावे NIA ला सुपूर्द करण्याते आदेश दिले.
ADVERTISEMENT
सुनावणीदरम्यान काय घडलं कोर्टात??
NIA कडून Additional Solicitor General अनिल सिंग यांनी बाजू मांडली. केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंदर्भातले आदेश जाहीर केले आहेत, ज्यामुळे या प्रकरणाचा तपास आता NIA कडे सोपवायला हवा असं म्हटलं. मात्र महाराष्ट्र एटीएसच्या अधिकाऱ्यांनी याला विरोध करत तपास NIA कडे वर्ग करताना राज्य सरकारची यामध्ये परवानगी घेतली नसल्याचा युक्तीवाद केला. एटीएसच्या वकीलांनी केलेल्या युक्तीवादाला अनिल सिंग यांनीही तात्काळ उत्तर दिलं.
हे वाचलं का?
“या प्रकरणाचा तपास CBI करत नाहीये, एखाद्या प्रकरणाचा तपास जेव्हा CBI करत असतं तेव्हा राज्य सरकारच्या परवानगीची गरज असते. परंतू NIA राज्य सरकारच्या परवानगीशिवाय एखाद्या प्रकरणाचा तपास आपल्या हाती घेऊ शकतं. याचसोबत जेव्हा एखाद्या घटनेचा तपास NIA कडे वर्ग करण्याचे आदेश निघतात. तेव्हा राज्य सरकार आणि संबंधित पोलीस यंत्रणांनी त्या प्रकरणातला तपास तात्काळ थांबवायचा असतो आणि सर्व कागदपत्र NIA कडे सुपूर्द करायची असतात.”
दोन्ही बाजूंचे युक्तीवाद ऐकल्यानंतर chief magistrate नी तात्काळ महाराष्ट्र एटीएसला मनसुख प्रकरणाचा तपास थांबवून सर्व कागदपत्र आणि पुरावे NIA ला सुपूर्द करण्याचे आदेश दिले. सचिन वाझे सध्या २५ मार्चपर्यंत NIA च्या कस्टडीत आहेत. सध्याच्या घडीला NIA करत असलेला तपास पाहता यापुढेही NIA वाझेंची कस्टडी मागण्याची शक्यता आहे. याचसोबत NIA ने वाझेंविरोधात UAPA नुसार गुन्हा दाखल करण्याचा अर्ज कोर्टासमोर केला आहे.
ADVERTISEMENT
हिरेन प्रकरणाचा तपास थांबवा, ठाणे कोर्टाचा ATS ला आदेश
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT