ठरलं! ‘या’ तारखांना होणार सवाई गंधर्व महोत्सव, पुणेकरांसाठी अभिजात संगीताची मेजवानी
आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित करण्यात येणारा ६८ वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव दिनांक १४ ते १८ डिसेंबर दरम्यान मुकुंदनगर येथील कटारिया शाळेच्या प्रांगणात संपन्न होणार असल्याची माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी कळवली आहे. सदर महोत्सव गेली दोन वर्षे कोरोनामुळे होऊ शकला नाही. यंदाचा महोत्सवात भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांची जन्मशताब्दी साजरी करण्यात येईल. […]
ADVERTISEMENT
आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित करण्यात येणारा ६८ वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव दिनांक १४ ते १८ डिसेंबर दरम्यान मुकुंदनगर येथील कटारिया शाळेच्या प्रांगणात संपन्न होणार असल्याची माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी कळवली आहे. सदर महोत्सव गेली दोन वर्षे कोरोनामुळे होऊ शकला नाही. यंदाचा महोत्सवात भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांची जन्मशताब्दी साजरी करण्यात येईल. याआधीचा महोत्सव डिसेंबर २०१९ मध्ये आयोजित करण्यात आला होता.
ADVERTISEMENT
गायन वादन आणि नृत्य यांचा त्रिवेणी संगम
गायन-वादन आणि नृत्य असा संगीताचा त्रिवेणी संगम घडविणारा, देशातील विविध संगीत घराण्यांच्या कलाकारांना बहुमान मिळवून देणारा आणि जगभरातील संगीतप्रेमींना आकर्षित करणारा हा सवाई गंधर्व संगीत महोत्सव म्हणजे विद्येचे माहेरघर असलेल्या सांस्कृतिक पुण्याचे केवळ भूषणच नाही, तर पुण्याच्या नावलौकिकामध्ये भर घालणारा ‘ब्रँड’च झाला आहे. कोणत्याही कलाकाराला ‘सवाई’च्या स्वरमंचावरून कलाविष्कार सादर करण्यामध्ये जीवनाची सार्थकता वाटते यामध्येच या महोत्सवाच्या यशाचे गमक सामावले आहे.
प्रतिभाशाली कलाकार होणार महोत्सवात सहभागी
महोत्सवात दरवर्षी आमंत्रित केल्या जाणाऱ्या कलावंतांमध्ये ज्येष्ठ कलाकार आणि नवोदित प्रतिभाशाली कलाकार यांचा संगम असतो. तरुण कलाकाराला या महोत्सवात कला सादर करण्याची संधी मिळणे म्हणजे कलाकार आपल्या क्षेत्रात एका ठराविक उंचीवर पोचला आहे, असे मानले जाते. कलाकाराबद्दलची माहिती, तो सादर करणार असलेल्या रागांबद्दल आणि त्यातील बंदिशीबद्दलची सविस्तर माहिती देणे हे सवाई महोत्सवात अगदी न चुकता होते. त्याचा परिणाम म्हणजे गाणे ऐकताना राग न कळल्यामुळे येणारी अस्वस्थता या महोत्सवाच्या मंडपात दिसत नाही.
हे वाचलं का?
काय आहे सवाई गंधर्व महोत्सवाची परंपरा?
उलट नंतर पुन्हा कधीतरी तोच राग वेगळ्या कलाकाराकडून ऐकताना ‘सवाई’मधील त्या मैफलीची हटकून आठवण होते. अशा कितीतरी कलाकारांचे स्वरदर्शन महोत्सवाच्या स्वरमंचावरून झाले आहे. हिराबाई बडोदेकर, सरस्वती राणे, पं. संगमेश्वर गुरव, गंगुबाई हनगळ, पं. फिरोज दस्तूर, पं. भीमसेन जोशी यांच्यासारखे सवाई गंधर्वाचा वारसा पुढे नेणारे कलाकार रसिकांचे कान तृप्त करीत राहिले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT