The Black Fungs : भीती बाळगू नका, समजून घ्या काय आहे आजार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

डॉ. रमाकांत पांडा

ADVERTISEMENT

कोरोनातून बरं झाल्यानंतर एका आजाराचा धोका सध्या चांगलाच बळावला आहे तो आहे Black Fungs अर्थात काळी बुरशी. काळी बुरशी का होऊ शकते? त्याची कारणं काय आहेत? हे समजावून सांगितलं आहे डॉक्टर रमाकांता पांडा यांनी. डॉ. रमाकांत पांडा हे एशियन हार्ट इन्स्टिट्युट मुंबईचे VC आणि MD आहेत. सध्या काळ्या बुरशीची भीती लोकांमध्ये वाढते आहे. मात्र या आजाराची कारणं काय? तो कशामुळे होतो हे डॉ. रमाकांत पांडा यांनी सोप्या भाषेत स्पष्ट केलं आहे.

काय म्हणतात डॉ. रमाकांत पांडा?

हे वाचलं का?

Black Fungus अर्थात काळ्या बुरशीबाबत भीती बाळगण्यापेक्षा तो आजार का होतो हे समजून घेणं जास्त आवश्यक आहे. सध्या आपल्या आप्तस्वकियांचे प्राण वाचवण्यासाठी ऑक्सिजनची गरज अनेकांना भासते आहे. अशात काळी बुरशी या आजाराने दहशत पसरवली आहे. काळ्या बुरशीचे रूग्ण वाढत आहेत. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी दिलेल्या माहितीनुसार राज्यात 1500 रूग्ण आहेत तर 90 जणांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे. ऑक्सिजन देताना जर अशुद्ध पाणी वापरलं गेलं तर Black Fungas होतोच.

ADVERTISEMENT

काय आहे काळी बुरशी?

ADVERTISEMENT

सध्या कोरोनातून बरं झालेल्या रूग्णांना म्युकरमायकोसिस या आजाराचा धोका वाढला आहे. काळी बुरशी या आजारालाच म्युकरमायकोसिस असं संबोधलं जातं आहे. हा आजार नवा नाही पण तसा दुर्मिळ आहे. म्युकरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार आहे. तो प्रामुख्याने आरोग्यांच्या समस्यांसाठी सातत्याने औषधं घेत असलेल्या लोकांना होण्याची शक्यता बळावते. एवढंच नाही तर सहव्याधी असलेल्या लोकांना कोरोना झाल्यानंतर त्यांची प्रतिकार शक्ती कमी होते, अशावेळी हा रोग होण्याची शक्यता जास्त असते.

अशुद्ध पाण्यावाटे जर ऑक्सिजनचा पुरवठा रूग्णाला झाला तर श्वासावाटे काळी बुरशीचा प्रभाव रूग्णाच्या शरीरावर होऊ लागतो. फुफ्फुसं, मेंदू यावर ही बुरशी परिणाम करते. त्याची लक्षणं नाक, नाकाचा मार्ग, टाळू, कान किंवा डोळ्यांवर दिसू लागतात. जर डोळ्यांना बाधा झाली तर वेदना होताता आणि दृष्टी प्रचंड अधू होते. अशावेळी डोळा काढण्यावाचून उपाय उरत नाही. इतर लक्षणं म्हणजे डोकेदुखी, खोकला, रक्ताच्या उलट्या, मानसिक स्थितीत होणारा बदल अशीही असू शकतात.

काळी बुरशी हा रोग वेगाने पसरतो आहे. खास करून E & T म्हणजेच कान, नाक, घसा तज्ज्ञांकडून या तपासणी करून या रोगाचे निदान केले जाते. MRI द्वारे या रोगाचं निदान लवकर होऊ शकतं. निर्जंतुकीकरण न करता वापरलेले पाणी वापरून जलनेती करणाऱ्या लोकांमध्येही या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. बुरशी ही आपल्या भोवती हजारो वर्षांपासून आहे. मधुमेह असेल किंवा स्टिरॉईड्स दिली जात असतील तर मोठ्या प्रमाणावर बुरशीचा आजार होण्याचा संभव असतो. अमेरिका, युरोप मधील देशांमद्ये काळ्या बुरशीच्या संसर्गाची लक्षणं फारच कमी आहे.

Mucor mycosis मुळे महाराष्ट्रात 90 मृत्यू, पुढचे दहा दिवस अत्यंत महत्त्वाचे-राजेश टोपे

भारतात अचानक दुसऱ्या लाटेत या रोगाचं प्रमाण का वाढलं?

याचं सगळ्यात मोठं कारण आहे ते म्हणजे ऑक्सिजनसाठी वापरलं गेलेलं अशुद्ध पाणी. या लाटेत अनेक रूग्णांना ऑक्सिजनची गरज भासली. त्यामुळे या रोगाचं प्रमाण वाढलेलं दिसून आलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अनेक रूग्णांना बरं होण्यासाठी स्टिरॉईड्स द्यावी लागली. यामुळे रोग प्रतिकारक शक्ती कमी होते. तसंच सहव्याधी असणाऱ्या लोकांना म्हणजेच डायबेटिस किंवा इतर आजार असणाऱ्या लोकांना हा आजार होण्याची शक्यता बळावते. सहव्याधी असणाऱ्यांना कोरोना झाला तर त्यांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी स्टिरॉईड्स द्यावी लागतात. त्यामुळे कोरोना बरा झाल्यानंतर या रोगाचं प्रमाण वाढल्याचं दिसून आलं आहे.

धक्कादायक! RTPCR नमुन्यांमध्ये बुरशी, आरोग्य विभागाचा हलगर्जीपणा

Black Fungus अर्थात काळी बुरशी ही आपल्या घरातही सापडू शकते. म्युकर मोल्डमुळे ती निर्माण होते. जनावरांचे शेण, माती, सडणारी लाकडं, फळं, कुजलेल्या भाज्या यामुळे ब्लॅक फंगस किंवा काळी बुरशी तयार होते. कोव्हिडच्या दुसऱ्या लाटेत आपल्याला याचं प्रमाण वाढताना दिसतं आहे याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे स्टिरॉईड्सचा वाढलेला वापर तर दुसरं कारण आहे ऑक्सिजनसाठीचं अशुद्ध पाणी. मेडिकल ऑक्सिजन आणि इंडस्ट्रीअल ऑक्सिजन यामध्ये बराच फरक आहे. कम्प्रेशन, तो गाळण्याची किंवा शुद्ध करण्याची पद्धती, शुद्धीकरण पद्धत याचे टप्पे वेगवेगळे आहेत. MO अर्थात मेडिकल ऑक्सिजन हा अत्यंत शुद्ध असतो. 99.5 टक्केंपेक्षा जास्त शुद्ध असलेला ऑक्सिजन हा सिलेंडर्समध्ये द्रव रूपात साठवला जातो आणि मग त्याची वाहतूक केली जाते. तसंच वापर झाल्यानंतर सिलिंडर्स निर्जंतुकीकरण करून अत्यंत स्वच्छ केली जातात. या ऑक्सिजनला आर्द्रता आवश्यक असते. प्रोटोकॉलनुसार निर्जंतुक केलेले पाणी वारंवार बदलणं आवश्यक आहे, ते पाणी तसे केले जात नसेल तर काळ्या बुरशीच्या संसर्गाचा तो मुख्य स्त्रोत आहे. मधुमेह आणि मधुमेह नसलेल्या कोव्हिड रूग्णांना हे निर्जंतुकीकरण न केलेले पाणी परिणाम करू शकते.

कोव्हिड १९ च्या उपचार पद्धतीत स्टिरॉईड्स योग्य प्रमाणात वापरली गेली पाहिजेत. स्टिरॉईड्स कोव्हिडच्या विरोधात लढण्यासाठी प्रभावी ठरतात, मात्र त्यामुळे प्रतिकारशक्ती कमी होते. जर स्टिरॉईड्स वेळेवर दिले गेले तर व्हायरसच्या कॉपीज तयार होत नाहीत. व्हायरसचं प्रमाण स्टिरॉईड दिल्यानंतर जर वाढलं तर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. मधुमेह जालेल्या रूग्णांना आवश्यक प्रमाणातच स्टिरॉईड्स देण्यात आला आहे. त्या रूग्णांना स्टिरॉईड देण्याचे प्रमाण जास्त झाले तर त्यांना काळ्या बुरशीचा आजार होण्याची शक्यता जास्त असते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT