Pune पुण्यात मोबाइलमुळे 19 वर्षीय नवविवाहित तरुणीने गमावला जीव?
पुणे: पुण्यातील (Pune) धायरी भागात राहणार्या एका नवविवाहित तरुणीचा मृतदेह (Dead Body) राहत्या घरात संशयास्पदरित्या सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे काही महिन्यांपूर्वीच प्रेम विवाह झालेल्या या तरुणीचा नवरा (Husband) हा तिच्या मृत्यूच्या दिवसापासून बेपत्ता झाला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचं गांभीर्य अधिकच वाढलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निशा अजय निकाळजे (वय 19 वर्ष) […]
ADVERTISEMENT
पुणे: पुण्यातील (Pune) धायरी भागात राहणार्या एका नवविवाहित तरुणीचा मृतदेह (Dead Body) राहत्या घरात संशयास्पदरित्या सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे काही महिन्यांपूर्वीच प्रेम विवाह झालेल्या या तरुणीचा नवरा (Husband) हा तिच्या मृत्यूच्या दिवसापासून बेपत्ता झाला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचं गांभीर्य अधिकच वाढलं आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, निशा अजय निकाळजे (वय 19 वर्ष) हिने काही महिन्यांपूर्वीच पती अजय निकाळजे (वय 21 वर्ष) याच्याशी प्रेम विवाह केला होता. ज्यानंतर ती पुण्यातील धायरी परिसरात राहण्यासाठी आली होती. मात्र, असं असताना काल (20 ऑगस्ट) अचानक या निशाचा मृतदेह राहत्या घरात आढळून आला.
सिंहगड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक, देवीदास घेवारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय आणि निशा यांचा काही महिन्यापूर्वी प्रेमविवाह झाला होता. दोघे सुरुवातीला जनता वसाहत येथे राहण्यास होते. मात्र तेथून वडगाव धायरी येथे राहण्यास आले होते.
हे वाचलं का?
त्या दोघांचा संसार ठिकठाक सुरू होता. पण निशाला मोबाईलवर बोलण्याची सवय होती. त्यावरून तू मोबाईलवर कोणाशी बोलत असतेस? असे म्हणून सातत्याने तिच्या अजय तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन वारंवार भांडण करायचा.
20 ऑगस्ट रोजी देखील दोघांमध्ये याच मुद्द्यावरुन भांडण झालं आणि त्याचवेळी पती अजय याने निशाचा गळा आवळून खून केली. असा आरोप मयत निशाच्या कुटुंबीयांनी केला आहे.
ADVERTISEMENT
निशाच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. त्या घटनेनंतर तिचा पती अजय हा पसार झाला आहे.
ADVERTISEMENT
चंद्रपूर : बहिणीच्या दिरासोबत जुळले प्रेमसंबंध, आईच्या मदतीने पतीची हत्या करणाऱ्या पत्नीला अटक
दरम्यान, पोलिसांना अद्याप अजय निकाळजेचा शोध लागू शकलेला नाही. सध्या त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळी पथकं तयार केली आहेत.
दुसरीकडे मयत निशा हिचा शवविच्छेदन अहवाल आल्यावरच स्पष्ट होईल की, तिची हत्या करण्यात आली आहे की, दुसऱ्या कारणाने तिचा मृत्यू झाला आहे. याशिवाय निशाचा पती तिच्या मृत्यूपासून गायब असल्याने त्याला देखील शोधून काढण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे.
एकीकडे निशाच्या कुटुंबीयांनी अजयनेच आपल्या मुलीची हत्या केला असल्याचा आरोप केलेला असला तरीही याबाबत नेमका पुरावा पोलिसांना अद्याप मिळू शकलेला नाही. त्यामुळे या प्रकरणाचा त्यांना सर्वच बाजूने तपास करावा लागणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT