रिलीजपूर्वी ‘द फॅमिली मॅन 2’ वादाच्या भोवऱ्यात; सिरीजवर बंदी घालण्याची मागणी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मनोज बाजपेयी स्टारर वेब सीरिज फॅमिली मॅन 2 चा ट्रेलर प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे. मात्र दुसरीकडे सोशल मीडियावर ए या वेब सिरीजवर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे. हे या मालिकेमध्ये मुख्य भूमिका साकारणारी समांथा अक्किनेनीमुळे आहे. या मालिकेला अँटी तमिळ असल्याचं म्हटलं जात आहे. यासाठी #FamilyMan2AgainstTamilians असा हॅशटॅग देखील ट्रेंडिंग आहे.

ADVERTISEMENT

मुख्य म्हणजे, वास्तविक, सामंथा वेब मालिकेत राजीची भूमिका साकारत आहे. हे पात्र तमिळ दाखवण्यात आलं आहे. सोशल मीडियावरील लोकांचं असं म्हणणं आहे की, द फॅमिली मॅन 2 मध्ये तमिळ लोकांना दहशतवादी म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. सामंथाची भूमिका तमिळ लोकांच्या विरोधात आहे आणि असं करून ते बर्‍याच वर्षांपासून तामिळांच्या संघर्षाचा अपमान करत आहेत.

दरम्यान सामंथाला तमिळ सिनेमातून बॉयकॉट करण्याबाबत देखील लोकं ट्विट करत आहे. याशिवाय काही लोकांनी अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडिओची मेंमबशिप रद्द करणार असल्याचं म्हटलंय. या वेब सिरीजचा ट्रेलर असंवेदनशील आणि चुकीचा असल्याचं लोकांचं म्हणणं आहे.

हे वाचलं का?

द फॅमिली फॅमिली 2 वेब सीरीजचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. अनेकजण या सिरीजच्या दुसऱ्या सिझनची आतुरतेने वाट पाहत होते. 4 जून रोजी ही सीरीज रिलीज करण्यात येणार असून अभिनेता मनोज वाजपेयी या सिरीजच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सीझनमध्‍ये श्रीकांत तिवारी नवीन, शक्तिशाली आणि क्रूर प्रतिस्‍पर्धी राजीचा सामना करणार आहे. अभिनेत्री सामंथा अक्किनेनी राजीची भूमिका साकारणार आहे. ‘द फॅमिली मॅन 2’ मधून साऊथची अभिनेत्री सामंथा अक्किनेनी डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण करत आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT