थोडीशी धाकधुक, थोडीशी उत्सुकता; पहिल्या दिवशी असं पार पडलं मुलांचं लसीकरण
कोरोनाविरुद्धच्या लढाईत लसीकरणाचा पुढचा आणि महत्वाचा टप्पा आजपासून देशभरात सुरु झाला आहे. १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला आजपासून देशभरात सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी याची घोषणा केली होती. मुंबईच्या दहीसर येथील कोविड सेंटरमध्ये आज पहिल्याच दिवशी इच्छुकांनी लसीकरणासाठी हजेरी लावली होती. पहिल्यांदाच लस घेतल्यामुळे अनेकांच्या मनाात भीती होती जी चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
कोरोनाविरुद्धच्या लढाईत लसीकरणाचा पुढचा आणि महत्वाचा टप्पा आजपासून देशभरात सुरु झाला आहे.
हे वाचलं का?
१५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला आजपासून देशभरात सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी याची घोषणा केली होती.
ADVERTISEMENT
मुंबईच्या दहीसर येथील कोविड सेंटरमध्ये आज पहिल्याच दिवशी इच्छुकांनी लसीकरणासाठी हजेरी लावली होती.
ADVERTISEMENT
पहिल्यांदाच लस घेतल्यामुळे अनेकांच्या मनाात भीती होती जी चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होती.
लस घेण्याआधी प्रत्येक मुलाला कोविन App वर आपली नोंदणी करणं आवश्यक असणार आहे.
अनेकांच्या मनात लसीबद्दल भीती असली तरीही काही मुलांनी धीर दाखवत लसीचा पहिला डोस घेतला.
आपला नंबर लागेपर्यंत काही जणांनी आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत फोटोसेशनलाही सुरुवात केली.
अनेक प्रगत देशांमध्ये लहान मुलांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. भारतासारख्या जास्त लोकसंख्या असलेल्या देशात आजपासून लहान मुलांना दिली जाणारी लस हा कोरोनाविरुद्ध लढाईत महत्वाचा टप्पा मानला जात आहे.
लहान मुलं ही आपल्या देशाचं भविष्य आहेत आणि हे भविष्य जर सुखरुप ठेवायचं असेल तर मुलांना कोरोनाची लस देण्याचं आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांनी केलं होतं.
लहान मुलांना लस देण्याआधी काही महिन्यांपासून देशात विविध रुग्णालयात क्लिनीकल ट्रायल सुरु होत्या. या चाचण्यांचे निकाल आल्यानंतरच या लसीकरणाला हिरवा कंदील मिळाला आहे.
सुईची भीती आजही अनेक मुलांच्या मनात कायम असते, लसीकरण केंद्रावर आजही हे चित्र पहायला मिळालं.
काही मुलं थोडीशी घाबरत पण मनात थोडासा धीर एकवटून लस घेत होती.
…तर काहींनी आपल्या पालकांना सोबत घेऊन लस घेण्याचं हे मोठं काम पार पडलं.
आपल्या मुलीला लस घेताना धीर देणारी आई
सोबत आई असली तरीही काहींच्या डोळ्यात अश्रू आलेच…
देशभरात ओमिक्रॉनचा धोका वाढत असताना लसीकरणाचा वेग वाढवणं सरकारी यंत्रणांसाठी क्रमप्राप्त झालेलं आहे.
आजच्या पहिल्या दिवशी मुंबई शहरात लहान मुलांनी लसीकरणाला दिलेला प्रतिसाद हा उत्साह वाढवणारा होता.
दहीसर येथील लसीकरण केंद्रावर आज पहिल्या दिवशी लसीकरणासाठी आलेली मुलं…
काहींच्या चेहऱ्यावर उत्सुकता तर काहींच्या चेहऱ्यावर भीती असंच काहीसं चित्र पहिल्या दिवशी दहीसर येथील केंद्रावर पहायला मिळालं.
लस घेताना काही जणांची सुईच्या भीतीमुळे पाचावर धारण बसली होती.
काही मुलांनी बिनदीक्कतपणे फार आढेवेढे न घेता लस घेतली.
ओमिक्रॉनचा धोका पाहता मुंबईत आज महापालिकेने पहिली ते नववी पर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यानच्या काळात लसीकरणाचा वेग वाढवून जास्तीत जास्त लोकांना कोरोनाची लस मिळावी यासाठी सरकारी यंत्रणा प्रयत्नशील आहेत.
दिवसभराच्या प्रतीक्षेनंतर लस घेतली की एक सेल्फी तर बनतोच नाही का??
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT