३५ वर्षांपूर्वी महाराष्ट्रात झाली होती पहिली शेतकरी आत्महत्या, डोळ्यात आसवं आणणारी गोष्ट

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रातल्या शेतकरी आत्महत्या हा अत्यंत चिंतेचा विषय ठरतो आहे. दुष्काळ, नापिकी, कर्ज या सगळ्याला कंटाळून शेतकरी आत्महत्या करतात. मात्र १९ मार्च १९८६ हा तो दिवस होता ज्या दिवशी महाराष्ट्रात पहिली शेतकरी आत्महत्या नोंदवली गेली. साहेबराव शेषराव करपे यांनी आत्महत्या केली त्या गोष्टीला आता ३५ वर्षे लोटली आहेत. मात्र त्यांची कहाणी ही डोळ्यात आसवं उभी करणारीच आहे. शेषराव करपे यांनी एकट्याने आत्महत्या केली नाहीत तर त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांनाही त्यांनी संपवलं.

ADVERTISEMENT

काय घडलं होतं त्या दिवशी?

१९ मार्च १९८६ ला साहेबराव करपे यांनी त्यांची पत्नी मालती आणि चार मुलींना संपवलं. त्यांची चौथी मुलगी आठ महिन्यांपेक्षा जास्त मोठी नव्हती. प्रत्येकाच्या कपाळावर एक रूपयाचं नाणं ठेवलं त्यानंतर साहेबराव करपे यांनी विष प्राशन केलं आणि प्राण सोडला. महाराष्ट्राच्या इतिहासात शेतकऱ्याची सरकार दप्तरी नोंदवली गेलेली ही पहिली आत्महत्या. शेषराव करपे यांनी कर्ज काढलं होतं. ते त्यांना फेडता आलं नाही, कर्जबाजारी झाल्याने त्यांनी आपल्यासह सहाजणांचं आयुष्य संपवलं.

हे वाचलं का?

साहेबराव करपे हे सधन शेतकरी होते, त्यांच्या नावावर १५० एकर जमीन होती तरीही त्यांनी आत्महत्या केली. येऊ द्या दया आता तरी गुरू माऊली, या आयुष्याची दोरी कमी जाहली हे भजन म्हणून त्यांनी जगाचा निरोप घेतला. या घटनेने सगळं गाव हादरलं. भव्य वाडा, त्यामध्ये घुमणारे संगीताचे सूर याच दिवशी लुप्त झाले. सततची नापिकी, कर्ज, वीज कनेक्शन तोडणं या घटनांमुळे साहेबराव करपे अस्वस्थ झाले, वैफल्यग्रस्त झाले. याच वैफल्यातून त्यांनी स्वतःसह कुटुंबाचं आयुष्य संपवलं.

१९ मार्च १९८६ हा शेतकऱ्यांच्या आयुष्यातील काळा दिवस ठरला. आपलं गाव छोटं आहे, आपल्या आत्महत्येची दखल कुणीही घेणार नाही हेदेखील त्यांना वाटलं होतं. मात्र तसं घडलं नाही. ती फक्त सुरूवात ठरली. साहेबराव करपेनंतर किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.. काय काय घडलं ते महाराष्ट्रातलं विदारक चित्र दाखवणारंच होतं.

ADVERTISEMENT

NCRB ने दिलेल्या माहितीनुसार २००४ ते २०१३ या काळात ३ हजार ६८५ शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात आपलं आयुष्य संपवलं आहे. मात्र शेतकऱ्यांच्या व्यथा आजही संपलेल्या नाहीत. साहेबराव करपे यांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा मृत्यू हा पहिली सामुदायिक शेतकरी आत्महत्या म्हणून नोंदवला गेला. मात्र त्यानंतर असे किती साहेबराव झाले? ही संख्या हजारोंच्या घरात आहे.

ADVERTISEMENT

साहेबराव करपे हे प्रगतीशील शेतकरी होते. महागाव तालुक्यातील चिलगव्हाण येथे त्यांनी आत्महत्या केली. या आत्महत्येची धग मात्र अजूनही कायम आहे. मागील पाच वर्षांपासून साहेबराव करपे पाटील यांच्या स्मृतीदिनी मान्यवर आणि स्थानिक नागरिकांच्या वतीने सामूहिक श्रद्धांजलीचा कार्यक्रम करण्यात येतो. एवढंच नाही तर अन्नदात्यासाठी अन्नत्याग ही मोहीमही सुरू करण्यात आली आहे.

एक दिवसाचा उपास करून या प्रगतीशील शेतकऱ्याला आणि त्याच्या कुटुंबीयाला आदरांजली वाहिली जाते. एका शेतकऱ्याची आत्महत्या विस्मृतीत गेली नाही… उलट तिची धग कायम राहिली आहे. मात्र या घटनेने महाराष्ट्र हादरला होता.. पुढेही राज्यावर अनेकदा ही वेळ आली ती अशाच प्रकारच्या आत्महत्यांच्या घटनांनी..आत्महत्या अद्यापही थांबलेल्या नाहीत. शेतकरी तोच आहे.. समस्या त्याच आहेत.. वीज तोडणी, कर्जबाजारी होणं… नापिकी हे सगळं आजही घडतंय. कृषीप्रधान देश, कृषीप्रधान राज्य ही आपली ओळख.. अन्नदाता ही शेतकऱ्याची ओळख. पण त्याच्यावर वेळ येते आहे गळफास घेण्याची… विष प्राशन करण्याची आणि स्वतःसह कुटुंबाला संपवण्याची.. त्याची उपेक्षा आजही संपलेली नाही.. ती कधी संपेल? याचं उत्तर तूर्तास तरी ना यंत्रणेकडे आहे ना सरकारकडे ना आणखी कुणाकडे…

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT