महाराष्ट्रासाठी पुढचे 48 तास खूप महत्त्वाचे, कारण…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: महाराष्ट्रासाठी पुढचे 48 तास खूप महत्त्वाचे ठरणार आहे. कारण याच 48 तासात ठरणार आहे की, राज्याचा श्वास थांबणार की नाही. कारण कोरोनामुळे राज्यात कोरोनाची परिस्थिती ही अतिशय गंभीर होत आहे. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही अत्यंत झपाट्याने वाढत आहे. अशावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता पुढील दोन दिवस हे खूप महत्त्वाचे असणार असल्याचं आजच्या आपल्या संबोधनात म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

पाहा मुख्यमंत्री ठाकरे नेमकं काय म्हणाले आहेत:

‘मी आता पूर्ण लॉकडाऊनचा फक्त इशारा देतोय, पण लॉकडाऊन जाहीर करत नाहीए. पण येत्या काही एक-दोन दिवसात मी तज्ज्ञ, इतर पक्षातील नेते, पत्रकार यांच्याशी या संपूर्ण विषयावर बोलणार आहे. त्यामुळे दोन दिवसांनी काही कडक निर्बंध लागू केले जातील. जे मी उद्या किंवा परवा जाहीर करणार आहे. पण जर तरीही परिस्थिती बदलली नाही तर गंभीर स्थिती रोखण्यासाठी जे जगामध्ये सुरु आहे तसं आपल्याला करावं लागेल. आपल्याला लॉकडाऊन करावं लागेल.’ असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले आहेत.

हे वाचलं का?

CM Thackeray: मी आता फक्त पूर्ण लॉकडाऊनचा इशारा देतोय, पण…: मुख्यमंत्री

राज्यात कोरोनाची साखळी तोडली नाही तर मात्र, आरोग्य व्यवस्था कोलमडून पडेल अशी भीती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. अशावेळी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आता सरकार काही कठोर निर्णय घेण्याची शक्यता आहे.

ADVERTISEMENT

Lockdown ची शक्यता अद्यापही टळलेली नाही-उद्धव ठाकरे

ADVERTISEMENT

मुख्यमंत्र्यांच्या संबोधनातील काही अत्यंत महत्त्वाचे मुद्दे:

  • कुणी मला व्हिलन ठरवलं तरी चालेल. पण मला माझा महाराष्ट्र प्यारा आहे. जनतेच्या जीवाची जबाबदारी माझ्यावर आहे. मी जीव वाचवण्याचा विचार करणार.

  • लष्कराच्या धर्तीवर आपण आपल्या महाराष्ट्रात फिल्ड हॉस्पिटल उभारले आहेत

  • महाराष्ट्रात कोरोनाची साखळी तोडली नाही तर पुढील 15 दिवसात आरोग्य सुविधा पुरणार नाही.

  • आरोग्य सुविधा वाढविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बेड्स, आयसीयू आणि व्हेंटिलेटर वाढवले जात आहेत. पण असं असलं तरीही डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी हे आपण कसे वाढवणार आहोत?

  • लस घेतली म्हणजे कोरोना होणार नाही असं पण लसीमुळे त्याची घातकता कमी होईल. असं स्वत: पंतप्रधान मोदींनी मला सांगितलं आहे.

  • येत्या काही एक-दोन दिवसात मी अनेक लोकांशी बोलणार आहे. काही कडक निर्बंध लावावे लागतील ते उद्या-परवा मी जाहीर करणार आहे.

  • सर्व राजकीय पक्षांना हात जोडून विनंती करतो की, यात राजकारण करु नका

  • आपल्याला कोरोनावर मात करायची आहे.

  • पूर्ण लॉकडाऊनचा इशारा देतोय, पण लॉकडाऊन जाहीर करत नाहीए.

  • आपण आता देखील लॉकडाऊन टाळू शकतो. फक्त आपल्या सहकार्याची आणि पूर्वी जी जिद्द होती ती दाखवणं गरजेचं आहे.

  • पुन्हा एकदा आपल्याला सर्व सणांवर बंदी घालावी लागेल.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT