मुंबईतल्या Corona रूग्णसंख्येत पुन्हा घट, आदित्य ठाकरे म्हणतात…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबईत दिवसभरात 5 हजार 888 रूग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. तर 8 हजार 549 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिवसभरात मुंबईत 71 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 39 हजार 584 चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट हा 85 टक्के झाला आहे. तर मुंबईचा डबलिंग रेट हा 54 दिवसांवर गेला आहे. मुंबईत बरे झालेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे त्यावर मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी समाधान व्यक्त केलं आहे.

ADVERTISEMENT

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

मुंबईत कोव्हिड बाधित होणाऱ्या रूग्णांपेक्षा बरं होणाऱ्या रूग्णांची संख्या वाढली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये रूग्णसंख्या कमी होते आहे ही नक्कीच समाधानाची बाब आहे. पण तरीही घरीच थांबा, मास्क लावा आणि सुरक्षित राहा या आशयाचं ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.

हे वाचलं का?

महाराष्ट्रात पुन्हा Lockdown का लावावा लागतो आहे? आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण

मुंबईत आत्तापर्यंत 12 हजार 719 रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत मुंबईत 5203436 चाचण्या झाल्या आहेत. मुंबईत आज घडीला 78775 अॅक्टिव्ह केसेस आहेत. मुंबईत आत्तापर्यंत एकूण 622109 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी 529233 रूग्ण बरे झाले आहेत.

ADVERTISEMENT

मुंबईत सलग सहाव्या दिवशी कोरोना रूग्णसंख्या 8 हजारांपेक्षा कमी झाली आहे. ही बाब निश्चितच काहीशी समाधानकारक आहे. मात्र कोरोना पूर्णपणे नियंत्रणात आला आहे असं नाही.

ADVERTISEMENT

महाराष्ट्राच्या वाट्याचा ऑक्सिजन पुरवठा मोदी सरकारने कमी करू नये-अजित पवार

मागील पाच दिवसांमधील रूग्णसंख्या आणि मृत्यू

23 एप्रिल 7 हजार 221 कोरोना रूग्ण, 72 मृत्यू

22 एप्रिल- 7140 कोरोना रूग्ण, 75 मृत्यू

21 एप्रिल 7684 कोरोना रूग्ण, 62 मृत्यू

20 एप्रिल – 7,294 कोरोना रूग्ण, 35 मृत्यू

19 एप्रिल – 7,381 कोरोना रूग्ण, 57 मृत्यू

मुंबईत कोरोना रूग्णसंख्या कमी होते आहे नक्कीच समाधानाची बाब आहे मात्र तरीही कुणीही काळजी घेणं सोडू नका. मास्क लावा, सुरक्षित अंतर ठेवा आणि घराबाहेर पडू नका असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.

येत्या 15 दिवसात फक्त मुंबईतल्याच नाही तर राज्यातल्याही केसेस कमी होतील. लोकांना प्रादुर्भावापासून रोखणं हे खूप आवश्यक आहे त्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करत आहोत’ असंही आदित्य ठाकरे यांनी मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. दुसऱ्या लाटेत कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला आहे. अशा वेळेस कोरोना रूग्णांची संख्या नियंत्रणात आणणं याकडेच आम्ही लक्ष केंद्रीत करतो आहे असंही आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलं

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT