रॉयल फॅमिलीच्या प्रिन्स फिलिप द ड्युक ऑफ एडिनबरा यांचं वयाच्या 99 व्या वर्षी निधन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

रॉयल फॅमिलीच्या प्रिन्स फिलिप द ड्युक ऑफ एडिनबरा यांचं वयाच्या 99 व्या वर्षी निधन झालं आहे. राणी एलिझाबेथ (दुसऱ्या) यांनी त्यांचे पती प्रिन्स फिलिप यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. विंडसर कॅसलमध्ये त्यांनी आज सकाळी अखेरचा श्वास घेतला. बकिंगहॅम पॅलेसने या संदर्भातलं अधिकृत वृत्त दिलं आहे. प्रिन्स फिलिप आणि एलिझाबेथ यांचा विवाह 1947 मध्ये झाला होता. या विवाहानंतर पाच वर्षांनी एलिझाबेथ यांना राजघराण्याची राणी हे पद मिळालं.

ADVERTISEMENT

बकिंगहॅम पॅलेसने काय म्हटलं आहे?

आज सकाळी प्रिन्स फिलिप यांचं निधन झालं. राणी एलिझाबेथ यांच्या प्रिय पतीने आपली जीवनयात्रा संपवली. याबाबतची माहिती राणी एलिझाबेथ यांनीच दिली आहे.

हे वाचलं का?

प्रिन्स फिलिप यांना हृदयाचा त्रास जाणवू लागल्याने 16 फेब्रुवारीला रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर दोन आठवड्यांनी म्हणजेच 3 मार्चला त्यांच्या हृदयावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. प्रिन्स फिलिप यांना 16 तारखेला किंग एडवर्ड VII या रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांच्या हृदयावर सेंट बार्थोलोम्यू या रूग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली.

ADVERTISEMENT

ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना पुन्हा किंग एडवर्ड रूग्णालयात आणलं गेलं. तिथे त्यांच्यावर पुढील उपचार करण्यात आले. सुमारे एक महिना त्यांच्यावर उपचार सुरू होते ज्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तिथून त्यांना विंडसर कॅस्टले या ठिकाणी आणण्यात आलं होतं. आज या ठिकाणी त्यांची प्राणज्योत मालवली.राणी एलिझाबेथ (दुसऱ्या) यांनी याबद्दलची घोषणा केली. त्यानंतर बकिंगहॅम पॅलेसने हे वृत्त देत शोक व्यक्त केला.

ADVERTISEMENT

प्रिन्स फिलिप यांचा 2016 मध्ये अपघातही झाला होता. त्यावेळी ते खूप थरथरलेही होती. मात्र सुदैवाने या अपघातात त्यांना कोणतीही इजा झाली नाही. त्यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असलेले बराक ओबामा यांच्या घरी डिनर झाल्यानंतर प्रिन्स फिलिप परतत होते. त्यावेळी त्यांच्या कारला अपघात झाला होता. बकिंगहॅमपॅलेसने तेव्हाही ही माहिती दिली होती की या अपघातात प्रिन्स फिलिप यांना कोणतीही इजा झाली नाही.

ब्रिटीश राजघराण्यातील सर्वात प्रदीर्घ काळसेवा देणारं जोडपं म्हणजे प्रिन्स फिलिप आणि राणी एलिझाबेथ (दुसरी). प्रिन्स फिलिप यांच्या निधनानंतर संपूर्ण ब्रिटन दुःखात बुडालं आहे. ब्रिटनमधील ऐतिहासिक इमारतींवरील ब्रिटिश ध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आले आहेत. राष्ट्रीय दुखवटाही जाहीर करणयात आला आहे.

नोव्हेंबर २०२० या महिन्यात प्रिन्स फिलिप आणि राणी एलिझाबेथ (दुसरी) यांनी त्यांच्या लग्नाची 73 वा लग्नाचा वाढदिवस साजरा केला होता. प्रिन्स फिलिप यांनी लॉकडाऊनच्या काळातच आपला 99 वा वाढदिवसही साजरा केला होता.

प्रिन्स फिलिप यांचा जन्म कोरफू आयलँडवर झाला होता. ब्रिटनच्या राजेशाही पद्धतीला आधुनिकीकरणाचं रूप देण्यात त्यांनी मुख्य भूमिका निभावली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT