NCP आणि BJP एकत्र येतील यात काहीही शंका नाही, पवार-शाह भेटीनंतर कुणी केलंय हे भाकित?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून ते सरकार कधी पडणार? हे सरकार पडणारच अशी भाकितं केली जात आहेत. अशातच आजच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट शरद पवार यांनी घेतली आहे. त्याच भेटीच्या दिवशी एक भाकित चर्चेत आलं आहे. हे भाकित आहे ते म्हणजे राज्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष एकत्र येतील. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पहाटे घेतलेला शपथविधी हा भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याचंच द्योतक होतं. मात्र शरद पवारांनी अजित पवारांचं बंड मोडून काढलं. अशात आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हे नवं भाकित केल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

ADVERTISEMENT

काय म्हणाल्या आहेत अंजली दमानिया?

राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकत्र येतील यात काहीच शंका नाही. जसं मिलिटरी अॅटॅक करताना रिट्रिट करताना कव्हर फायर देतात तसाच प्रकार आपण नवाब मलिक यांच्या पत्रकार परिषदेच्या रूपाने पाहिला. नवाब मलिक यांची पत्रकार परिषद ही पवार आणि शाह भेटीला कव्हर अप करण्यासाठी होती. बहुतेक ठाकरेंना दाखवायला की आम्ही भाजपच्या विरूद्ध आहोत. हे ट्विट करून अंजली दमानिया यांनी खळबळ उडवून दिली आहे.

हे वाचलं का?

एवढंच नाही तर त्यांनी तीन तारखांचेही संदर्भ दिले आहेत. अंजली दमानिया म्हणतात, 15 जुलैला फडणवीस आणि भुजबळ भेटतात (निरोप घेऊन?) 16 जुलै फडणवीस दिल्लीला जातात, 17 जुलै शरद पवार मोदींना भेटतात. महाराष्ट्राच्या राजकारणाचं वाटोळं आता बघवत नाही. असंही ट्विट दमानिया यांनी केलं आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं त्यामध्ये दोन व्यक्तींचा पुढाकार होता. एक होते शरद पवार आणि दुसरे होते संजय राऊत. या दोघांनी काँग्रेसला शिवसेनेसोबत येण्यासाठी सोबत आणलं. शरद पवारांचा यामध्ये मोठा वाटा होता यात शंकाच नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून धुसफूस सुरू असल्याचं दिसतं आहे. अर्थात सगळेच नेते आमच्यात काहीही बिघडी नाही असं सांगण्यात आलं आहे. मात्र नाना पटोले यांची स्वबळाची भाषा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची उद्धव ठाकरेंनी केलेली तक्रार असे कितीतरी प्रसंग सांगता येतील. अशात आता अंजली दमानिया यांनी मात्र थेट राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकत्र येतील यात शंकाच नाही असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे आणि अनेकांच्या भुवयाही उंचावल्या आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT