ठाण्यात हॉटस्पॉटमध्ये लॉकडाऊन नाही, पालिका अधिकाऱ्यांची कोलांट उडी
ठाणे: ठाण्यातील 16 हॉटस्पॉटमध्ये लॉकडाउन करण्याच्या निर्णयावरुन महापालिका अधिकाऱ्यांनी 24 तासाच्या आता कोलांट उडी घेतली आहे. जे नियम सर्वत्र लागू आहेत तेच नियम हॉटस्पॉटमध्ये देखील असतील. मिशन बिगीन अगेन हॉटस्पॉटमध्ये देखील तेच नियम लागू असणार आहे. त्यामुळे कोणतेही नवीन निर्बंध नसतील अशी नवी माहिती ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आज दिली आहे. काल काढलेल्या नोटिफिकेशनवर आज अधिकाऱ्यांनी […]
ADVERTISEMENT
ठाणे: ठाण्यातील 16 हॉटस्पॉटमध्ये लॉकडाउन करण्याच्या निर्णयावरुन महापालिका अधिकाऱ्यांनी 24 तासाच्या आता कोलांट उडी घेतली आहे. जे नियम सर्वत्र लागू आहेत तेच नियम हॉटस्पॉटमध्ये देखील असतील. मिशन बिगीन अगेन हॉटस्पॉटमध्ये देखील तेच नियम लागू असणार आहे. त्यामुळे कोणतेही नवीन निर्बंध नसतील अशी नवी माहिती ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आज दिली आहे. काल काढलेल्या नोटिफिकेशनवर आज अधिकाऱ्यांनी घुमजाव केला आहे. दरम्यान, आज पालिका अधिकाऱ्यांनी जरी पलटी मारली असली तरी ठाणेकरांसाठी ही बातमी दिलासादायक ठरली आहे.
ADVERTISEMENT
काल काढलेल्या नोटिफिकेशनमध्ये स्पष्ट म्हणण्यात आले होते, की हॉटस्पॉटमध्ये लॉकडाऊन असेल तर बाकी ठिकाणी मिशन बिगीन अगेनचे नियम असतील. दरम्यान, अचानक लॉकडाऊनचा निर्णय घेतल्याने लोकांमध्ये घबराट आणि गोंधळ निर्माण झाला. तसेच राज्य सरकारकडून देखील पालिका प्रशासनाला विचारणा करण्यात आली. त्यामुळे स्पष्टीकरण देण्याची नामुष्की ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर आली होती. त्यामुळे 24 तासात ठाणे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पलटी मारली.
दरम्यान, ठाण्यातील हॉटस्पॉट मध्येही सर्व आस्थापनं चालू असणार आहेत. हॉटस्पॉटमध्ये देखील लॉकडाऊन नसेल, जे नियम सर्वत्र लागू आहेत तेच नियम हॉटस्पॉटमध्ये देखील असतील. मिशन बिगीन अगेन हॉटस्पॉटमध्ये देखील लागू असणार आहेत. असं स्पष्टीकरण ठाणे महापालिकेकडून देण्यात आलं आहे.
हे वाचलं का?
मुंबईत पुन्हा Lockdown लागणार का? पालकमंत्र्यांनी दिलं हे उत्तर
ठाणे शहरात अनलॉकनंतर सर्वकाही आलबेल झाले असतानाच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने शहरात कहर माजवण्यास सुरूवात केली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील तीन परिमंडळात १६ ठिकाणं कोरोनाची हॉटस्पॉटमध्ये म्हणजेच प्रतिबंधित क्षेत्रं निश्चित केली आहे.
ADVERTISEMENT
महाराष्ट्र पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर? जाणून घ्या परिस्थिती
ADVERTISEMENT
ठाणे परिमंडळ एकमधील कळवा प्रभाग समिती क्षेत्रात विटावा,आईनगर,सूर्यनगर,खारेगाव परिसर हे हॉटस्पॉट आहे.तर,परीमंडळ दोनमध्ये चेंदणी कोळीवाडा,वागळे व श्रीनगर परिसर हॉटस्पॉट आहेत. परिमंडळ ३ मध्ये सर्वाधिक हॉटस्पॉट असून यात माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रातील,बाळकुम,लोढा व लोढा आमारा, हिरानंदानी इस्टेट, हिरानंदानी मेडोज गृहसंकुले आणि लोकमान्य-सावरकरनगर प्रभाग समिती क्षेत्रात दोस्ती विहार,शिवाई नगर,कोरस टॉवर, कोलबाड, रुस्तुमजी ‘ वृदांवन हे परिसर हॉटस्पॉट आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT