मृणालताईंच्या वेळी सुसंवाद होता, आता कोथळा काढण्याची भाषा-शरद पवार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात अनेकांनी प्रचंड योगदान दिलं. त्या अनेकांपैकी काहींची आठवण ही प्रकर्षाने आपल्या सगळ्यंना होते. त्यात मृणालताई गोरे यांची आठवणही महत्त्वाची आहे असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर ‘मृणालताई गोरे सदनात असताना अनेकदा वाद व्हायचे. ते राज्याचे हिताचे असायचे. सुसंवाद पाहायला मिळायचा. तो सुसंवाद आता नाही आता कोथळा काढण्याची भाषा केली जाते.’ असं शरद पवार यांनी आज बोलून दाखवलं.

ADVERTISEMENT

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते मृणालताई गोरे यांच्या दालनाचे उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि अध्यक्षस्थानी बाबा आढाव यांची उपस्थिती होती. केशव गोरे स्मारक ट्रस्टच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. याच कार्यक्रमात शरद पवारांनी हे वक्तव्य केलं आहे.

हे वाचलं का?

याच महिन्याच्या सुरूवातीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नाव न घेतला शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसल्याची टीका केली होती. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना खरमरीत उत्तर दिलं होतं आणि म्हणाले होते की खंजीर खुपसण्याची आमची परंपरा नाही आम्ही थेट कोथळा काढतो. संजय राऊत यांनी जुन्नरमध्ये हे वक्तव्य केलं होतं. या दोघांमधला हा वाद चांगलाच चर्चेला आला होता.

नेमकं काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

ADVERTISEMENT

स्वबळावर सत्ता आणण्यासाठी आपली तयारी सुरू आहे. यापुढे कुणीही नको आपल्याला सोबत. कुणाच्याही कुबड्यांची गरज नाही. आरपीआय, रयत क्रांती संघटना आणि महादेव जानकर यांचा रासप तसंच विनायक मेटेंचा शिवसंग्राम हे पक्ष पुरेसे आहेत. आजवर पाठीत खंजीर खुपसला असं म्हटलं की कुणाचा चेहरा यायचा समोर? ते एक नाव होतं आता दुसरा चेहरा कुणाचा येतो ? त्यावर कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे असं उत्तर दिलं. चंद्रकांत पाटील यांनी थेट नाव घेतलं नाही मात्र ही टीका त्यांनी उद्धव ठाकरेंवरच केली आहे. पाठीत खंजीर खुपसणारा दुसरा चेहरा म्हणजे उद्धव ठाकरे असंच त्यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

संजय राऊत यांनी काय उत्तर दिलं होतं?

पूर्वी खंजीर खुपसणे फक्त पवार साहेबांबद्दल बोलत होते, आता उद्धव ठाकरेंबद्दल बोललं जातंय. मी चंद्रकांत पाटलांना एवढंच सांगू इच्छितो की आम्ही समोरुन कोथळा काढतो, पाठीमागून वार करण्याची परंपरा आमच्यात नाही. शब्द तर तुम्ही फिरवलात आम्ही नाही, मग आता युती कशी होणार?

आज शऱद पवारांनी मृणालताई गोरे यांची आठवण काढत असताना आणि त्यावेळी कसे वाद असूनही सुसंवाद होता आणि आता थेट कोथळा काढण्याची भाषा केली जाते आहे असं म्हटलं आहे. शरद पवार यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण ज्या शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी आहेत त्याच शिवसेनेला त्यांनी ही बाब सुनावली आहे.

संजय राऊत यांचा पाटलांना सल्ला, शिवचरित्रातून कोथळा काढणं म्हणजे काय ते समजून घ्या

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्त जे भाषण केलं त्या भाषणात भाजपचा उल्लेख भावी सहकारी असा केला. उद्धव ठाकरे यांचं हे वक्तव्य शरद पवारांना आवडलं नसल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगते आहे. अशातच शरद पवारांनी कोथळा काढण्याची भाषा आता होते आहे असं म्हणत एक प्रकारे नाव न घेता शिवसेनेला सुनावलं आहे का? अशीही चर्चा सुरू झाली आहे.

सुभाष देसाई मुख्यमंत्र्याच्या वक्तव्याबाबत काय म्हणाले?

मुख्यमंत्री बोलल्यांनातर चर्चा होणारच आणि चर्चा झाली तर वावग नाही. जे आमच्याबरोबर येतात ते सहकारीच होतात, आता त्यात त्यांना अभिप्रेत काय आहे हे मुख्यमंत्रीच सांगू शकतील. त्यातून आणखी अर्थ शोधण्याची गरज नाही.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT