शनिवार-रविवार शहरात लसीकरण बंद, मुंबई महापालिकेची माहिती
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असलेल्या महाराष्ट्रात लसींच्या तुटवड्यामुळे राज्य सरकारला १८ ते ४४ वयोगटाचं लसीकरण थांबवावं लागलंय. मुंबईत अनेक केंद्रावर लसीचा पुरेसा साठा नसल्यामुळे लोकांना परत जावं लागतंय. अशा परिस्थितीत मुंबई महापालिकेने शनिवार-रविवारी लसीकरण बंद ठेवलं आहे. लसीकरणाबद्दलची पुढची माहिती नागरिकांना लवकरच कळवण्यात येईल असं महापालिकेने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन जाहीर केलंय. मुंबईकरांनो, आम्ही […]
ADVERTISEMENT
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असलेल्या महाराष्ट्रात लसींच्या तुटवड्यामुळे राज्य सरकारला १८ ते ४४ वयोगटाचं लसीकरण थांबवावं लागलंय. मुंबईत अनेक केंद्रावर लसीचा पुरेसा साठा नसल्यामुळे लोकांना परत जावं लागतंय. अशा परिस्थितीत मुंबई महापालिकेने शनिवार-रविवारी लसीकरण बंद ठेवलं आहे.
ADVERTISEMENT
लसीकरणाबद्दलची पुढची माहिती नागरिकांना लवकरच कळवण्यात येईल असं महापालिकेने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन जाहीर केलंय.
मुंबईकरांनो,
आम्ही सूचित करू इच्छितो की १५ व १६ मे, २०२१ रोजी लसीकरण प्रक्रिया बंद ठेवण्यात येत आहे.
लसीकरणाविषयी पुढील माहिती आपल्याला लवकरच कळवण्यात येईल.#MyBMCVaccinationUpdate #WeShallOvercome #MyBMCUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) May 14, 2021
लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस कधी घ्यायचा यावरुन सध्या लोकांमध्ये बराच गोंधळ निर्माण झालाय. एकीकडे महापालिका लसीच्या तुटवड्यामुळे लसीकरण बंद ठेवत असताना शहरात लसीकरणावरुन श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे.
हे वाचलं का?
भाजपला सत्तेतून दूर करण्यासाठी ३ पक्षांनी मिळून बनवलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्वकाही आलबेल आहे असं चित्र दिसत नाहीये. मुंबईतील वांद्रे पूर्व मतदार संघात कोरोना लसीकरण केंद्राच्या उद्घाटनावरुन पोस्टरबाजी करणाऱ्या शिवसेनेला काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांनी खडे बोल सुनावले आहेत.
Welcome to the Grand vaccination utsav by Shiv Sena in Bandra East. There are more posters than vaccines here. Are vaccines being bought by Shiv Sena personal party fund as I don’t see any mention of MVA anywhere? Stop glorifying openings of vaccination centres, this is our duty! pic.twitter.com/AFM3cyNBcs
— Zeeshan Siddique (@zeeshan_iyc) May 13, 2021
झिशान सिद्दीकी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर वांद्रे पूर्व मतदार संघात लसीकरण केंद्राच्या उद्घाटनासाठी शिवसेनेने लावलेल्या पोस्टर्सचे फोटोग्राफ टाकत प्रश्न विचारला आहे. “इथे लसींपेक्षा तुम्हाला पोस्टर्सच जास्त दिसतील. या लसी शिवसेना स्वतःच्या पार्टी फंडातून आणते आहे का? कारण मला कुठेही महाविकास आघाडी सरकारचा उल्लेख दिसत नाहीये. लसीकरण केंद्राच्या उद्घाटनाचा गाजावाजा करणं थांबवा, ते आपलं कामच आहे”, असं म्हणत सिद्दीकी यांनी सेनेला टोला लगावला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT