तालिबानी संस्कृतीलाही लाजवेल असे ठाकरे सरकार, आशिष शेलार यांनी व्यक्त केला संताप

मुस्तफा शेख

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक समोरासमोर आले. एवढंच नाही तर अध्यक्षांच्या दालनाबाहेर विरोधक आणि सत्ताधारी यांच्या धक्काबुक्कीही झाली. सभागृह आणि अध्यक्षांच्या दालनात गोंधळ घातल्याने भाजपच्या बारा आमदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. या कारवाईवरून संताप व्यक्त करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कामकाजावर बहिष्कार घालून सभात्याग केला. याबाबत आता आशिष शेलार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

ADVERTISEMENT

आज सभागृहात जी घटना घडली आणि त्यावर ज्या पद्धतीची शिक्षा सुनावली गेली हा सगळा प्रकार तालिबानी संस्कृतीलाही लाजवेल असा आहे. महाराष्ट्रावर तालिबानी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस राज्य करू पाहात आहेत. याचा मी निषेध करतो. असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

अध्यक्षांच्या दालनात शिवी देणारे सदस्य भाजपचे नव्हते. तरीही तालिका सभापती भास्कर जाधव यांची मी संपूर्ण पक्षाच्या वतीने माफी मागितली आहे. ही बाब स्वतः भास्कर जाधव यांनीही मान्य केली. मी छगन भुजबळ यांनी मांडलेल्या प्रस्तावावर केवळ दहा मिनिटं हरकतीचा मुद्दा मांडला. ओबीसी समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्याची भूमिका छगन भुजबळ यांनी घेतली, त्याविरोधात मी माझा मुद्दा मांडला. मी माफी मागूनही निलंबनाची कारवाई करण्यात आली. तालिबानी ठाकरे सरकारचे अभिनंदन, पण जनतेतील लढाई आशिष शेलार आणि भाजप आणखी तीव्र करणार आहे. माझा सामना करण्याची ताकद शिवसेनेमधे नाही त्यामुळे त्यांनी नो बॉलमध्ये विकेट काढण्याचा प्रयत्न केला. मी क्रिकेटचा खेळाडू आहे. मी दोन्ही हाताने बॉलिंग करेन आणि सभागृहाबाहेर तुमची पळता भुई थोडी करेन असंही आव्हान आशिष शेलार यांनी शिवसेनेला दिलं आहे.

हे वाचलं का?

भाजपच्या एकाही सदस्याने भास्कर जाधव यांना शिवी दिली नाही. आमच्या पक्षाचे सदस्य पीठासीन अधिकाऱ्याच्या जवळ गेले होते त्यांनी खाली खेचून आणलं. हे सगळं व्हीडिओ लायब्ररी आणि उपस्थित असलेल्या पत्रकारांनी पाहिलं. ओबीसींच्या आरक्षणाच्या विषयात बोलू न दिल्याने संविधानिकरीत्या त्रागा व्यक्त करणाऱ्या आमच्या सदस्यांना सुद्धा जागेवर बसवण्याचं काम मी केलं हे देखील संपूर्ण सभागृहाने पाहिलं आहे असंही शेलार यांनी स्पष्ट केलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT