नवाब मलिकांनी सांगितलं सॅम डिसूझाचं खरं नाव, म्हणाले हा तर….

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आता आपला मोर्चा सॅम डिसूझाकडे वळवला आहे. सॅम डिसूझाचा फोटो ट्विट करत नवाब मलिकांनी एक कॅप्शन दिली आहे. ही कॅप्शन चांगलीच चर्चेत आहेत. आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक झाली होती त्यानंतर तीन दिवसातच पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक यांनी एनसीबीची सगळी कारवाई बोगस आणि बनाव असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांनी अनेकदा पत्रकार परिषद घेऊन समीर वानखेडे, के. पी. गोसावी, मनिष भानुशाली या सगळ्यांवर आरोप केले. समीर वानखेडे यांनी मुस्लिम असल्याचं लपवल्याचा आरोपही त्यांनी केला होता. आता नवाब मलिक यांनी सॅम डिसूझाचा फोटो ट्विट केला आहे.

ADVERTISEMENT

काय म्हणाले आहेत नवाब मलिक?

नवाब मलिकांनी फोटो ट्विट करत याचं नाव सॅम डिसूझा नसून सॅनविल स्टॅनली डिसूझा आहे असं म्हटलं आहे.

हे वाचलं का?

सॅम डिसूझाने काय म्हटलं होतं?

सॅम डिसूझा याने जो घटनाक्रम सांगितला तो आरोप सॅम डिसूझाने तसाच सांगितला आहे. मात्र खंडणी मागितल्याचे आरोप त्याने फेटाळून लावले आहेत. खंडणी के. पी. गोसावी आणि प्रभाकर साईल या दोघांनी मागितल्याचं सॅमने म्हटलं होतं. तर प्रभाकर साईलने सॅमवर खंडणी मागितल्याचे आरोप केले होते. दरम्यान आर्यन खान प्रकरण घडल्यानंतर हे लोक पळून गेले मी मुंबईतच होतो. माझ्यावर आरोप झाले म्हणून मी माध्यमांसमोर आलो असंही सॅमने सांगितलं होतं.

ADVERTISEMENT

नकली देवेंद्र ते 15 कोटींची पार्टी; नवाब मलिक यांचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार

ADVERTISEMENT

2 ऑक्टोबरला समीर वानखेडेंनी त्यांच्या टीमसह म्हणजेच एनसीबीच्या टीमसह कॉर्डिलिया क्रूझवर छापा मारला आणि आर्यन खानसह एकूण आठ जणांना अटक केली. तेव्हापासून हे प्रकरण गाजतं आहे. दोन दिवसांपूर्वीच समीर वानखेडेंकडून या प्रकरणासह पाच प्रकरणांमधले चौकशीचे अधिकार काढून घेण्यात आले. त्यानंतर नवाब मलिक यांनी त्यांचा मोर्चा सॅम डिसूझाकडे वळवला आहे. आज नवाब मलिक पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामध्ये ते काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशातच आज सकाळी त्यांनी सॅमचा फोटो ट्विट करून खळबळ उडवून दिली आहे. प्रसारमाध्यमांसमोर आलेला हा माणूस सॅम डिसूझा नाही त्याचं खरं नाव वेगळं आहे असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. आता आज नवाब मलिक यावरून का बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT