TET परीक्षेत अपात्र असणाऱ्यांनाही मेरिटमध्ये केलं पास, पुणे पोलीस आयुक्तांची माहिती

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे: टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात तब्बल 7 हजार 900 जणांनी लाखो रुपये देऊन पात्र झाल्याचे प्रमाणपत्र मिळविल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. तसेच या उमेदवारांनी ओएमआर शीटमध्येही मार्क वाढविले असल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाचा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात येणार असल्याची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

ADVERTISEMENT

यावेळी अमिताभ गुप्ता म्हणाले की, ‘टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. काही दिवसापूर्वी 7 हजार 900 अपात्र उमेदवारांनी पैसे देऊन पात्रता मिळविल्याचे दिसून आले होते. त्यानुसार आमचा तपास सुरू असताना काहींची कास्ट कॅटेगरी बदलण्यात आली.

या उमेदवारांना पात्र करण्यासाठी प्रश्नपत्रिका सोडविताना काही कोडवर्ड देण्यात आले होते. तसेच ओएमआर शीटमध्ये मार्क वाढविले गेले आहेत. यामुळे या प्रकरणी लाखो रुपये देऊन हे सर्व उमेदवार पास झाले असून या प्रकरणाचा अहवाल लवकरच राज्य सरकारला दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हे वाचलं का?

पैसे देऊन पात्रता यादीत नाव घुसवणाऱ्या या 7800 शिक्षकांच्या नोकरी आता धोक्यात आल्या आहेत. पोलिसांकडून अहवाल गेल्यानंतर या शिक्षकांवर सरकारकडून बडतर्फीची कारवाई केली जाऊ शकते.

आतापर्यंत आरोग्य भरती तसेच TET परीक्षा गैरव्यवहारात दाखल झालेल्या पाच गुन्ह्यांमध्ये तब्बल 40 जणांना अटक करण्यात आली आहे. तर टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे (Tukaram Supe), माजी आयुक्त सुखदेव डेरे, शिक्षण विभागाचा तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर, जीए टेक्नॉलॉजीचा अश्विन कुमार, सौरभ त्रिपाठी, डॉ. प्रीतिश देशमुख यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनाही अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्या चौकशीतून नवी माहिती समोर येत आहे.

ADVERTISEMENT

TET परीक्षेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार! तुकाराम सुपेंनी लाटले 1.70 कोटी, देशमुखला मिळाले 1.25 कोटी

ADVERTISEMENT

नेमकं काय आहे प्रकरण?

आरोग्य विभागाच्या पेपरफुटी प्रकरणी पुणे पोलिसांकडून तपास सुरू होता. संशयितांच्या हालचालीचा मागोवा घेऊन पुणे व ठाणे परिसरामध्ये नेमलेल्या पथकांनी संशयित संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ या दोघांच्या हालचालीचा मागोवा घेतला. त्यांना Creta गाडीमधून (क्रमांक MH20 /EL 7111) ताब्यात घेण्यात आले. यावेळी त्यांच्या गाडीमध्ये डॉ. प्रीतिश देशमुख हेही आढळून आले. प्रीतिश देशमुख हे G.A.software या कंपनीचे संचालक असून, त्यांच्या संस्थेतर्फे MHADA च्या लेखी परीक्षा घेतल्या जाणार होत्या.

प्रीतिश देशमुख याच्या झडतीमध्ये त्याच्यासोबत असलेल्या लॅपटॉपमध्ये MHADA च्या लेखी परीक्षेचे पेपर मिळून आले होते. तसेच त्यांच्यासोबत लिफाफ्यामध्ये पेन ड्राईव्ह पोलिसांना सापडले होते. त्यामध्येही MHADA च्या लेखी परीक्षेचे पेपरसेट होते. ही कारवाई करताना प्रीतिश देशमुखकडे टीईटी परीक्षेची ओळखपत्र आढळून आल्यानं टीईटी परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा संशय आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT