Nagpur: ‘महिलेच्या अंगावर लव्ह लेटर फेकणं हा विनयभंगच’, नागपूर खंडपीठाचा निकाल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

योगेश पांडे, नागपूर

ADVERTISEMENT

विवाहित महिलेच्या अंगावर प्रेम पत्र फेकणं हा गुन्हाच आहे असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने (Nagpur bench of Mumbai High Court) दिला आहे. विवाहित महिलेच्या अंगावर ‘आय लव्ह यू’ लिहलेली चिठ्ठी फेकणं हे एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे. कारण हा एक प्रकारचा विनयभंगच (Molestation) असल्याचा निर्णय कोर्टाने या प्रकरणात दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अकोला (Akola) येथील रहिवासी असणाऱ्या एका 45 वर्षीय विवाहित महिलेचा 2011 साली एका 54 वर्षीय व्यक्तीने विनयभंग केला होता. आरोपी व्यक्तीने पीडित महिलेला एक प्रेमपत्र दिले होते. पण पीडितेने ते पत्र घेण्यास नकार दिला होता. यावेळी आरोपीने ते पत्र पीडितेच्या अंगावर फेकत तिला ‘आय लव्ह यू’ असं म्हणाला होता.

हे वाचलं का?

आरोपी एवढ्यावरच थांबला नव्हता तर त्याने पीडित महिलेला धमकी देखील दिली असल्याचा महिलेने आरोप केला होता. या संपूर्ण प्रकरणाबाबत अकोला येथील स्थानिक पोलिसात तक्रार देखील दाखल करण्यात आलेली होती.

यानंतर हे प्रकरण कोर्टात गेलं जिथे सुनावणीनंतर आरोपी व्यक्तीला दोषी ठरविण्यात आलं आहे. याचप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विवाहित महिलेच्या अंगावर प्रेमपत्र फेकणे हा देखील गंभीर गुन्हाच असल्याचं आपल्या निर्णयात म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

याप्रकरणी सुरुवातीला प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी कोर्टाने आरोपीला 2 वर्षांचा सश्रम कारावास आणि 10 हजार दंड अशी शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला आरोपीने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. ज्यावर मागील अनेक दिवसांपासून सुनावणी सुरु होती. अखेर आता हायकोर्टाने देखील त्याला दोषी ठरवलेलं आहे.

ADVERTISEMENT

एखाद्या स्त्रीचा विनयभंग झालेला आहे की नाही यासाठी काही विशिष्ठ परिमाणं लागू करता येत नाही. त्यामुळे विवाहित महिलेच्या अंगावर चिठ्ठी फेकणं हा विनयभंग आहे. असं कोर्टाने आपल्या निकालात म्हटलं आहे. कोर्टाने आरोपी दोषी असल्यावर शिक्कामोर्तब केल्याने आता आरोपीला शिक्षा भोगावी लागणार हे निश्चित झालं आहे.

तोकडे कपडे घातल्याचा जाब विचारत मलंगगड भागात तरूणांना मारहाण, दोन तरूणींचा विनयभंग

देशात महिलांना अधिक सुरक्षित वातावरणात वावरता यावं याच दृष्टीने हा निर्णय कोर्टाने दिला असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे. यामुळे अशा प्रवृत्तींना आळा बसण्यास नक्कीच मदत होईल.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT