स्वतःचं अपयश झाकण्यासाठी कोरोनाचा वापर होतोय? मनसेचा सरकारला टोला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यातील महत्वाच्या शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढीस लागल्यामुळे राज्य सरकारसमोरची चिंता वाढलेली आहे. काही शहरांमध्ये राज्य सरकारने लॉकडाउन तर काही शहरांमध्ये संचारबंदीसह कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. परंतू गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालसह अनेक महत्वाच्या राज्यांत निवडणुकांचे वारे वाहत आहेत. इथे जाहीर सभेला लाखो लोकांची गर्दी होते आहे. विरोधकांनीही यावरच बोट ठेवत सरकारच्या धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.

ADVERTISEMENT

महाराष्ट्राला लागून असलेल्या गोवा, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश इथे कोरोना वाढत नाही. कोरोनाचं महाराष्ट्रावर प्रेम आहे की महाराष्ट्र सरकारचं कोरोनावर प्रेम आहे?? स्वतःचं अपयश झाकण्यासाठी टाळे बंदी आणि कोरोनाचा वापर होतोय का? असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी विचारला आहे.

गेल्या काही दिवसांपासून मनसुख हिरेन, अंबानींच्या घरासमोर सापडलेल्या स्कॉर्पिओ मधील स्फोटकांप्रकरणी राज्य सरकार चांगलंच अडचणीत पडलं आहे. NIA ने या प्रकरणाचा तपास हाती घेतल्यानंतर मुंबई पोलिस दलातील अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली आहे. या प्रकरणावरुन विरोधक राज्य सरकारवर तुटून पडत आहेत. या पार्श्वभूमीवर मनसेने राज्य सरकारला टोला लगावला आहे.

हे वाचलं का?

पाहा ३१ मार्चपर्यंत महाराष्ट्रात काय-काय असणार निर्बंध

1. राज्यातील सर्व सिनेमागृह (सिंगल स्क्रीन आणि मल्टिप्लेक्स), हॉटेल्स / रेस्टॉरंट हे 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील.

  • मास्क न घातलेल्या लोकांना प्रवेश देण्यात येणार नाही. प्रवेश करताना प्रत्येक व्यक्तीच्या शरीराचं तापमान तपासलं जाईल.

ADVERTISEMENT

  • योग्य ठिकाणी सॅनिटायझरचा पुरवठा करण्यात यावा

  • ADVERTISEMENT

  • मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात आहे की नाही, यासाठी माणसं नेमण्यात यावीत.

  • महाराष्ट्रात दिवसभरात १५ हजारांपेक्षा जास्त नवे Corona रुग्ण

    2. सर्व शॉपिंग मॉलसाठी देखील वरील नियमच लागू असणार आहेत.

    3. मोठ्या प्रमाणात गर्दी होईल अशा प्रकारचे सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रम घेण्यास बंदी. याबाबत निर्बंध न पाळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसंच जिथे या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेलं असेल त्या ठिकाणांवर देखील कायदेशीर कारवाई केली जाईल.

    6. होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्यांनी पुढील नियम पाळावेत:

    • कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची माहिती स्थानिक प्रशासनाला देण्यात यावी. यावेळी रुग्णावर आयसोलेशन दरम्यान कोणत्या डॉक्टरकडून उपचार सुरु आहेत याबाबतची माहिती देखील कळविण्यात यावी.

    • ज्या घरामध्ये कोरोना रुग्ण आहे तिथे 14 दिवसांसाठी घराबाहेर त्यासंबंधी पाटी लावण्यात यावी.

    • होम क्वॉरंटाइन असणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या हातावर तसा स्टॅम्प मारण्यात यावा.

    • रुग्णांच्या कुटुंबीयांनी घराबाहेर ये-जा करणं शक्यतो टाळावं. मास्कचा वापर काटेकोरपणे करण्यात यावा.

    • वरील नियम मोडल्यास रुग्णांना स्थानिक प्रशासनाकडून तात्काळ कोविड केअर सेंटरमध्ये नेण्यात येईल.

    7. अत्यावश्यक सेवा आणि आरोग्य सेवेशी संबंधित कार्यालये वगळता इतर सर्व ठिकाणी 50 टक्के क्षमतेने कार्यालये सुरु ठेवावीत.

    • वर्क फ्रॉर्म होमला प्राधान्य देण्यात यावं.

    • ऑफिसमध्ये मास्कचा वापर अनिवार्य आहे.

    • नियम मोडणाऱ्या कार्यालयांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

    ADVERTISEMENT

      follow whatsapp

      ADVERTISEMENT