लठ गाड़ दिया छोरे ! Tokyo Olympics गाजवणाऱ्या नीरज चोप्रावर शुभेच्छांचा वर्षाव

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

टोकियो ऑलिम्पिकमध्ये अखेरचा दिवस भारतीयांसाठी आनंददायी ठरला. २३ वर्षीय भालाफेकपटू नीरज चोप्राने अंतिम फेरीत सुवर्णपदक मिळवत भारताचा शेवट गोड पद्धतीने केला आहे. १ सुवर्ण, २ रौप्य आणि ४ कांस्य पदक अशा ७ पदकांसह ऑलिम्पिकतमधली भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी मानवली जात आहे. नीरजने ८७.५८ मी. लांब भाला फेकत सुवर्णपदकावर नाव कोरलं.

ADVERTISEMENT

या ऐतिहासिक कामगिरीनंतर नीरजवर सर्व देशभरातून कौतुकाचा वर्षाव होतो आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी नीरजचा सामना पाहताना लठ गाड़ दिया छोरे ने असं म्हणत त्याचं कौतुक केलंय. हरियाणा सरकारने या कामगिरीसाठी नीरज चोप्राला सहा कोटींचं बक्षीस आणि सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली आहे. तसेच याचसोबत नीरज चोप्राला सरावासाठी पंचकुला येथे सवलतीच्या दरात जागा देण्याची तयारीही हरियाणा सरकारने दाखवली आहे.

मनोहरलाल खट्टर यांनी नीरज चोप्राच्या वडिलांशी फोनवरुन संवाद साधत नीरजला आगामी काळात सरावासाठी हरियाणा सरकारकडून हवी असलेली सर्व मदत केली जाईल असं आश्वासन दिलं आहे.

हे वाचलं का?

२३ वर्षीय नीरज चोप्रा भारतीय लष्कराचं प्रतिनिधीत्व करतो. राजपूताना रायफल्स रेजिमेंटच्या पथकात नीरज चोप्रा आहे. या कामगिरीनंतर हरियणात त्याच्या गावी जल्लोष सुरु असून नीरजचे वडील सतीश चोप्रा यांनी सर्व देशवासियांचे आभार मानले आहेत. या देशवासियांनी पाहिलेलं स्वप्न माझ्या मुलाच्या मेहनतीने साध्य झालं याचा मला अभिमान आहे. तो ज्या पद्धतीने सराव करत होता ते पाहता तो यंदा सुवर्णपदक जिंकेल याची आम्हाला खात्री होती अशी प्रतिक्रीया दिली.

तब्बल १३ वर्षांनी मिळालेल्या या सुवर्णपदानंतर देशातल्या सर्व वरिष्ठ नेत्यांनीही नीरजवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

ADVERTISEMENT

२००८ साली बिजींग ऑलिम्पिक स्पर्धेत अभिनव बिंद्राने भारतासाठी सुवर्णपदक पटकावलं होतं, त्यानंतर सुवर्णपदक पटकावणारा नीरज चोप्रा भारताचा दुसरा खेळाडू ठरला आहे. जर्मनी, चेक रिपब्लीक, पाकिस्तान यांचं कडवं आव्हान मोडून काढत नीरजने ८७.५८ मी. लांब भाला फेकत सुवर्णपदकावर नाव कोरलं.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT