लस संशोधनातील भीष्माचार्य असं सुरेश जाधव यांना का म्हटलं जात होतं? जाणून घ्या..

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सीरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक डॉ. सुरेश जाधव यांचं दीर्घ आजारानं निधन झालं आहे. डॉक्टर जाधव हे 72 वर्षांचे होते. सिरम इन्स्टिट्यूटकडून कोरोनावरील कोव्हिशील्ड वॅक्सीन तयार करण्यात डॉक्टर जाधव यांचा सिंहाचा वाटा होता. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. मात्र पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये त्यांचं निधन झालं. डॉक्टर जाधव यांच्या जाण्यानं भारतीय वैद्यकिय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

ADVERTISEMENT

Sputnik-V: सीरम आता भारतात बनवणार रशियन बनावटीची स्पुटनिक-V लस, DCGI ची मंजुरी

डॉ. सुरेश जाधव यांची कारकीर्द

हे वाचलं का?

डॉ. सुरेश जाधव यांनी नागपूर विद्यापीठातून फार्मसीमध्ये ‘पीएच. डी.’ घेतली. 1970 पासून पाच दशकं अखंड सेवा दिली.

सुरुवातीला नागपूर विद्यापीठ आणि ‘एसएनडीटी’ विद्यापीठ येथे शिक्षक म्हणून काम केलं

ADVERTISEMENT

सन 1979 पासून सीरम इन्स्टिट्यूट येथे रुजू झाले

ADVERTISEMENT

त्यांचा कार्यकाळ मार्च 2022 पर्यंत होता, मात्र प्रकृती अस्वास्थामुळे त्यांनी ऑक्टोबरमध्ये स्वेच्छा निवृत्ती घेतली होती.

हापकिनमध्ये संशोधक म्हणून त्यांनी लस उत्पादनासंबंधी काम सुरू केलं होतं.

समजून घ्या : कोव्हिशिल्ड की कोवॅक्सीन, कुठली लस तुम्हाला देते सर्वात जास्त अँटीबॉडीज?

WHO च्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी देखील डॉ. जाधव यांना श्रद्धांजली वाहिली. “अतिशय दुःखद बातमी. लस विकासासाठी आयुष्यभर मोठं योगदान देऊन लोकांचे जीव वाचवले. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो,” असं म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

डॉ. जाधव हे बुलढाण्यासारख्या छोट्या गावातून पुण्यात आले. त्यांनी भारतातील लस संशोधनात जागतिक स्तरावर काम करून आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यामुळे सुरेश जाधव यांना भारतीय लस संशोधनातील भीष्माचार्य म्हटले जात. त्यांच्या नावे जगातील अनेक पेटंटची नोंद आहे. कोरोना प्रतिबंधक कोव्हिशिल्ड लसीच्या निर्मितीमध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे. डॉ. जाधव यांच्या जाण्यामुळे भारतीय वैद्यकिय क्षेत्राची अपरिमित हानी झाली असल्याची भावना औषध निर्माण क्षेत्रातून व्यक्त करण्यात होते आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT