IAS अधिकारी बदल्यांचा दुसरा टप्पा : आस्तिक कुमार पांडे औरंगाबादचे नवे जिल्हाधिकारी
मुंबई : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा दुसरा टप्पा बुधवारी सायंकाळी पार पडला. या टप्प्यात २० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात आस्तिक कुमार पांडेंकडे औरंगाबादचे जिल्हाधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय लीना बनसोड यांची अवघ्या १२ दिवसांत बदली झाली आहे. तर एस. सी. पाटील यांची देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात सहसचिव म्हणून […]
ADVERTISEMENT
मुंबई : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा दुसरा टप्पा बुधवारी सायंकाळी पार पडला. या टप्प्यात २० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात आस्तिक कुमार पांडेंकडे औरंगाबादचे जिल्हाधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय लीना बनसोड यांची अवघ्या १२ दिवसांत बदली झाली आहे. तर एस. सी. पाटील यांची देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात सहसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवशी शिंदे-फडणवीस सरकारमधील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीचा पहिल्या टप्पा पार पडला होता. यात जवळपास ४३ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर १२ दिवसांतच आणखी २० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी : नाव आणि नव्या नियुक्तीचे ठिकाण
1. मिताली सेठी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद – चंद्रपूर यांची संचालक, वनामती – नागपूर येथे नियुक्ती
हे वाचलं का?
2. वीरेंद्र सिंग, आयुक्त, वैद्यकीय शिक्षण यांची व्यवस्थापकीय संचालक, Maha I.T. कॉर्पोरेशन येथे नियुक्ती.
3. सुशिल चव्हाण, जिल्हाधिकारी, औरंगाबाद यांची विकास आयुक्त (असंघटित कामगार), मुंबई येथे नियुक्ती.
ADVERTISEMENT
4. अजय गुल्हाने, जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांची अतिरिक्त महापालिका आयुक्त, नागपूर येथे नियुक्ती.
ADVERTISEMENT
5. दीपक कुमार मीना, अतिरिक्त महापालिका आयुक्त, नागपूर यांची अतिरिक्त आदिवासी आयुक्त, ठाणे येथे नियुक्ती.
6. विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद – सातारा यांची जिल्हाधिकारी, चंद्रपूर येथे नियुक्ती
7. आर. के. गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद – नंदुरबार यांची अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी, मुंबई येथे नियुक्ती.
8. माणिक गुरसाळ,अतिरिक्त आयुक्त (उद्योग) येथे नियुक्ती.
9. शिवराज श्रीकांत पाटील, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको-मुंबई यांची व्यवस्थापकीय संचालक महानंद – मुंबई येथे नियुक्ती.
10. अस्तिक कुमार पांडे, जिल्हाधिकारी-औरंगाबाद येथे नियुक्ती.
11. लीना बनसोड, यांची व्यवस्थापकीय संचालक, आदिवासी विकास महामंडळ – नाशिक येथे नियुक्ती
12. दीपक सिंगला, व्यवस्थापकीय संचालक, आदिवासी विकास महामंडळ – नाशिक यांची सहआयुक्त, एमएमआरडीए – मुंबई येथे नियुक्ती.
13. एल. एस. माळी, सचिव, शुल्क नियामक प्राधिकरण-मुंबई यांची संचालक, इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण संचालनालय – पुणे येथे नियुक्ती.
14. एस. सी. पाटील, सहसचिव उपमुख्यमंत्री कार्यालय मंत्रालय येथे नियुक्ती.
15. डी.के. खिलारी, सह महानिरीक्षक, स्टॅम्प्स यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद – सातारा येथे नियुक्ती.
16. एस. के. सलीमथ, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद – पालघर यांची व्यवस्थापकीय संचालक, सिडको – मुंबई येथे नियुक्ती.
17. एस.एम. कुर्तकोटी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार येथे नियुक्ती.
18. आर. डी. निवतकर, जिल्हाधिकारी, मुंबई यांची आयुक्त, वैद्यकीय शिक्षण – मुंबई येथे नियुक्ती. जिल्हाधिकारी मुंबईचा अतिरिक्त प्रभार.
19. बी.एच.पालवे, अतिरीक्त आयुक्त, विभागीय आयुक्त, नाशिक यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद – पालघर येथे नियुक्ती.
20. आर. एस. चव्हाण, सहसचिव, महसूल मुद्रांक आणि वन विभाग मंत्रालय, मुंबई येथे नियुक्ती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT