जळगाव : कंटेनर चालकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू, थरारक अपघात सीसीटीव्हीत कैद

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

– मनिष जोग, जळगाव प्रतिनिधी

ADVERTISEMENT

जळगाव शहरातील खेडी पेट्रोल पंपाजवळ एका कंटेनर चालकाचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जगदीशसिंह बोरा (वय 38) असं या चालकाचं नाव आहे. कंटेनर पार्किंग करत असताना विजेच्या डीपीचा धक्का लागल्यामुळे या चालकाचा मृत्यू झाला असून हा अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

जगदीश बोरा हा उत्तराखंड राज्यातील पिथोरागडचा रहिवासी आहे. जगदीश बोरा हे कंटेनर घेऊन जळगाववरुन जात असताना खेडी येथील पेट्रोल पंपावर थांबले होते. यावेळी कंटेनर पार्किंग करत असताना शेजारी असलेल्या डीपीचा धक्का कंटेनरला लागला.

हे वाचलं का?

यावेळी जगदीश बोरा हे नेमके कंटेनरमध्ये असताना त्यांना विजेचा धक्का लागून ते जागीच मृत्यूमुखी पडली. ही घटना घडल्यानंतर पेट्रोल पंपावरील लोकांनी स्थानिक एमआयडीसी पोलीस ठाण्याला याची कल्पना दिली. खिशातील आधार कार्डावरुन चालकाची ओळख पटली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT