तौकताई Cyclone : मुंबईच्या आकाशात ढगांची गर्दी, महाराष्ट्रावर काय होणार परीणाम?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अरबी समुद्रात तौकतई चक्रीवादळ आलं आहे. त्याचा परीणाम हा आता मुंबई, नवी मुंबई आणि कोकणात पाहण्यास मिळतो आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. मुंबईच्या निरभ्र आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये काही ठिकाणी पाऊस पडला. नवी मुंबईतल्या पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. गेल्या अनेक दिवसांपासून उकाड्याने त्रस्त झालेल्या मुंबईकरांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

ADVERTISEMENT

महाराष्ट्रात 15 आणि 16 मे रोजी मुसळधार पाऊस ते अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या वादळाच्या पार्श्वभूमीवर ऑरेंज अलर्टही जारी करण्यात आला आहे. तौकताई चक्रीवादळ लक्षद्विप, केरळ, कर्नाटक किनारपट्टी आणि तामिळनाडूच्या काही भागांमध्येही अतिवृष्टी होते आहे. गुजरातच्या दिशेने हे वादळ 15 ते 17 मेच्या दरम्यान जातं आहे त्यामुळे कोकणातील प्रामुख्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात अतिवृष्टी आणि तीव्र वादळ असणार आहे. एवढंच नाही तर 15 आणि 16 मे या दोन दिवशी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांमध्येही वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

कोकण किनारपट्टीवर अलर्ट जारी

हे वाचलं का?

अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या तौकताई वादळामुळे कोकण किरनापट्टीवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. गोव्यात NDRF ची टीमही मदत आणि बचाव कार्यासाठी दाखल झाली आहे. या चक्रीवादळाची तीव्रता दुपारनंतर वाढणार आहे. कोकण किनारपट्टीवर अलर्ट जारी करण्यात आला आहे तर काही भागांमध्ये ऑरेंज अलर्टही देण्यात आला आहे.

चक्रीवादळ: महाराष्ट्राच्या दिशेने सरकतंय ‘टाँकटाई’ वादळ, किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा

ADVERTISEMENT

मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळतील असा अंदाज जाहीर करण्यात आला होता. ज्यानुसार मुंबईत हलक्या सरी कोसळल्या आहेत. कोकणात मुसळधार पाऊस, वीजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहणार आहे. रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडेल. विदर्भातही मेघगर्जनेसह वीजांचा कडकडाट होईल असं हवामान खात्याने स्पष्ट केलं आहे.

ADVERTISEMENT

16 मे म्हणजेच रविवारी महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनारपट्टीच्या भागात वादळी वारे वाहतील आणि या भागातील मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच जे मच्छीमार खोल समुद्रात आहेत त्यांनी लवकरात लवकर जवळच्या किनाऱ्यावर परण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT