ट्विटरने माझा मुद्दा सिद्ध करून दाखवला; अकाऊंट सस्पेंड केल्यावर कंगनाची प्रतिक्रिया

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सोशल मीडियावर परखडपणे मतं मांडणाऱ्या अभिनेत्री कंगना राणौतला ट्विटरने मंगळवारी चांगला मोठा झटका दिला आहे. कंगनाचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं आहे. कंगना नेहमी तिच्या ट्विटच्या माध्यमातून चर्चेत असते. मात्र यावेळी ट्विटरने तिचं अकाऊंट सस्पेंड करून टाकलं आहे. दरम्यान यावर कंगनाने तिचं मत व्यक्त केलं आहे.

ADVERTISEMENT

कंगना एएनआयला बोलताना म्हणाली, “ट्विटरने असं करत माझ्या मुद्द्याला सिद्ध करून दाखवलंय की, तो एक अमेरिकन असून जन्मापासूनच, एक गोरा व्यक्ती एखाद्या गडद व्यक्तीवर आपले हक्क समजण्यास सुरवात करतो. ते तुम्हाला सांगू इच्छितात की आपण काय विचार केला पाहिजे, काय बोललं पाहिजे आणि काय केलं पाहिजे.”

कंगना पुढे म्हणते, “माझ्याकडे असे अनेक प्लॅटफॉर्म आहेत जिथे मी माझा आवाज उठवू शकते. मी सिनेमांद्वारे देखील माझी कला लोकांना दाखवू शकते. देशातील अशा लोकांबद्दल माझं दुखावलं जातं, ज्यांचा छळ केला जात आहे, ज्यांना नोकर म्हणून ठेवलं आहे आणि त्यांच्यावर हजारो वर्षांपासून निर्बंध ठेवलेत. या दु:खाचा अंत नाही.”

हे वाचलं का?

पश्चिम बंगाल निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कंगनाने ममता बॅनर्जी यांच्यावर टिका केली होती. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात तृणमूल काँग्रेस विजयी झाल्यानंतर कंगनाने पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. अभिनेत्री कंगना रणौतने मायक्रो-ब्लॉगिंग साईटच्या नियमांविरूद्ध मजकूर पोस्ट केल्यानंतर तिचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT