जगाला तालिबानपासून, राज्याला धनुष्यबाणापासून धोका ! राणेंना अटक, राणा जगजितसिंहाचं ट्विट आणि सोशल मीडियावर नवा राडा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

– गणेश जाधव, उस्मानाबाद प्रतिनिधी

ADVERTISEMENT

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर केंद्रीय. मंत्री नारायण राणे यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. राज्यभरात आज शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरुन भाजपविरोधात घोषणाबाजी केली. परंतू राणेंच्या अटकेनंतर उस्मानाबाद जिल्ह्यात सोशल मीडियावर दोन जुने हाडवैरी सोशल मीडियावर समोरासमोर आले आहेत.

भाजपच्या तिकीटावर तुळजापूर मतदारसंघातून निवडून आलेले आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी राणेंच्या अटकेचा निषेध करत आपल्या ट्विटर अकाऊंटवर, जगाला तालिबानपासून आणि राज्याला धनुष्यबाणापासून खरा धोका आहे असं ट्विट केलं.

हे वाचलं का?

राणा जगजितसिंहांच्या या ट्विटला उत्तर देताना उस्मानाबादचे शिवसेना खासदार आणि जगजितसिंहाचे पारंपरिक विरोधक ओमराजे निंबाळकर यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय. धनुष्यबाण हे अर्जुनाचं अस्त्र आहे, त्यापासून खरा धोका हा कौरवांनाच असल्याचं ट्विट ओमराजेंनी केलं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

या दोन पारंपरिक विरोधकांमध्ये रंगलेल्या वादात सोशल मीडियावरही शिवसैनिकांनी उडी घेत जगजितसिंह पाटलांना टीकेचं लक्ष्य केलं.

उस्मानाबादमध्ये ओमराजे निंबाळकर आणि पद्मसिंह पाटील यांच्या घराण्यांमधला वाद हा सर्वश्रृत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर मध्यंतरीच्या काळात राणा जगजतिसिंह शिवसेनेत प्रवेश मिळतो का याची चाचपणी करत होते. यासाठी त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेटही घेतली. परंतू ओमराजेंच्या विरोधामुळे त्यांचा हा प्रयत्न फसला. अखेरीस राणा जगजितसिंहांनी भाजपची वाट धरत तुळजापूर मतदारसंघातून निवडणूक लढली.

शिवसेनेने तमाशे बंद करावेत नाहीतर BJP राज्यभर तांडव करेल – आशिष शेलार

दरम्यान ओमराजेंनी केलेल्या टिकेलाही सध्या उस्मानाबादेत भाजपच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर चांगलंच उत्तर द्यायला सुरुवात केली आहे. भाजप समर्थकांच्या Whats App ग्रूपमध्ये शिवसेनेच्या नेत्यांना रंगा-बिल्लाची उपमा देत मोदी लाटेत खासदार, आमदार निवडून आलेल्यांनी कौरव-पांडवांचं उदाहरण देऊ नये. आपला पाठीमागचा इतिहास तपासावा. त्यामुळे राणेंच्या अटकेनंतर उस्मानाबाद जिल्ह्यात शिवसेना-भाजपमध्ये सोशल मीडियावर रंगलेल्या या वादाने पार अफगाणिस्तान-रामायण ते महाभारतापर्यंत मजल मारली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT