कुत्र्यांच्या पिल्लांना झाडावरून फेकत बीडमध्ये दहशत पसरवणाऱ्या दोन वानरांना वनविभागाने केलं जेरबंद

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

.रोहिदास हातागळे, प्रतिनिधी, बीड

ADVERTISEMENT

बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात असलेल्या लवूळ गावात कुत्रे आणि वानरं यांच्यात चक्क दुश्मनी पाहण्यास मिळते आहे. कुत्र्याचं पिल्लू दिसलं की ते उचलून वानरं झाडावर नेतात आणि खाली फेकून देतात. आता या प्रकरणी दोन वानरांना वन विभागाने जेरबंद केलं आहे. दोन वानरांना जेरबंद करून त्यांना आता नागपूर येथील जंगलात सोडून देण्यात आलं आहे.

काय आहे प्रकरण?

हे वाचलं का?

माजलगाव तालुक्यातील लवूळ भागात माकडं आणि वानरांचा वावर काही नवा नाही. परंतू काही दिवसांपासून विचित्र प्रकार पहायला मिळतो आहे . सध्या गावात कुत्रे आणि माकडांमध्ये संघर्ष सुरू झाला आहे . आजपर्यंत कुत्र्यांची अनेक पिल्लं मेली आहेत. मात्र त्या पिल्लांना माकडांनी मारलं नसून त्यांना अन्न पाणी न मिळाल्याने ती पिल्लं मेली असल्याची माहिती गावचे उपसरपंच गणेश शिंदे यांनी दिली आहेत.

दिसलं कुत्र्याचं पिल्लू की फेक झाडावरून खाली! बीडमधल्या गावात वानरांची जबरदस्त दहशत

ADVERTISEMENT

माकडं आणि वानरं यांच्या दहशतीमुळे लहान पोरं सोरं माकडांपासून वाचण्यासाठी सैरावैरा धावत आहेत . अख्खं गाव कुत्रे आणि माकडांच्या दहशतीखाली आहे . ग्रामस्थांनी माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी थेट धारुर येथील वन विभागाशी संपर्क साधला असून तीन माकडांपैकी दोन माकडं वन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली आहेत.

ADVERTISEMENT

माकडं येतात आणि कुत्र्यांची पिल्लं शोधतात . पिल्लू दिसलं रे दिसलं की त्या पिल्लाला उचलून घेऊन जातात आणि त्यांना त्यांच्या ताब्यात ठेवले जाते.यात या पिल्लांना खायला आणि प्यायला पाणी मिळत नाही यात त्या पिल्लांचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी कुत्र्यांनी माकडाच्या पिल्लावर हल्ला केला होता . त्या घटनेनंतर या गावात रोज माकडं येतात आणि कुत्र्यांच्या पिल्लांना घेऊन जातात,अशी चर्चा आहे .

जवळपास पाच हजार लोकसंख्या असलेल्या या गावाला या वानरांनी पुरते बेजार करून टाकलं आहे.रस्त्यावरून चालणाऱ्या माणसावर सुद्धा या वानरांनी हल्ले केलेत त्यामुळे लोक आता रस्त्याने चालताना सुद्धा मागे पुढे बघत असतात लहान मुलांना तर एकटे घराबाहेर लोक सोडत नाहीत रात्रीचं सोडा दिवसासुद्धा बाहेर फिरताना लोकांमध्ये या वानरांची दहशत पाहायला मिळते आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT