Omicron : आता मुंबईत आढळले ओमिक्रॉनचे दोन रूग्ण, महाराष्ट्रातली रूग्णसंख्या 10

मुस्तफा शेख

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे दोन रूग्ण आज मुंबईत आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या रूग्णांची संख्या 10 झाली आहे. कल्याण डोंबिवली परिसरात महाराष्ट्रातला ओमिक्रॉन व्हेरिएंटचा पहिला रूग्ण आढळला. त्यानंतर पुणे आणि पिंपरी भागात एकूण सात रूग्ण आढळले होते. आता मुंबईत दोन रूग्ण आढळले आहेत अशी माहिती समोर आली आहे. भारतात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या रूग्णांची संख्या 23 आहे. त्यातले दहा रूग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत.

ADVERTISEMENT

37 वर्षांची एक महिला जोहान्सबर्ग साऊथ अफ्रिका या ठिकाणाहून 25 नोव्हेंबरला मुंबईत आली होती. त्या महिलेला ओमिक्रॉन व्हेरिएंटची बाधा झाली आहे. तर एक 36 वर्षीय माणूस 25 तारखेला USA मधूम मुंबईत आला. त्यालाही याच ओमिक्रॉन व्हेरिएंटची बाधा झाली आहे. दोघांवरही मुंबईतल्या सेव्हन हिल्स रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या दोघांनीही कोव्हिड प्रतिबंधात्मक फायजरची लस घेतली होती. दरम्यान पाच हाय रिस्क रूग्ण आणि 315 लो रिस्क रूग्णांचीही तपसाणी करण्यात येते आहे.

हे वाचलं का?

Omicron Variant: ओमिक्रॉन व्हेरिएंटची दहशत, भारत सरकारकडून नव्या गाइडलाइन जारी

पुणे आणि पिंपरीत एकाच दिवशी सात रूग्ण

ADVERTISEMENT

24 नोव्हेंबर 2021 ला नायजेरियातल्या लेगॉस शहरातून आपल्या भावाला भेटण्यासाठी आलेली 44 वर्षीय महिला, तिच्या सोबत आलेल्या दोन मुली आणि पिंपरी चिंचवड शहरात राहणारा तिचा भाऊ आणि त्याच्या दोन्ही मुली अशा एकूण सहा जणांच्या प्रयोगशाळा नमुन्यामध्ये ओमिक्रॉन (Omicron) विषाणू सापडल्याचा अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने आज संध्याकाळी दिला आहे. तसेच पुणे शहरातील एका 47 वर्षीय पुरुषाला देखील या व्हेरिएंटचा संसर्ग झाल्याचे नॅशनल केमिकल लॅबोरेटरीच्या अहवालाने स्पष्ट केलं आहे.

ADVERTISEMENT

ओमिक्रॉनशी कसं लढता येईल?

WHO ओ म्हणते की ओमिक्रॉनसह SARS-CoV-2 चे पसरणारे सर्व प्रकार अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी अधिक रिसर्चची गरज आहे. शक्य तितक्या, प्रभावित क्षेत्रांची चाचणी करा आणि Omicron चे वर्तन समजून घेण्यासाठी प्रयोगशाळांचे मूल्यांकन करावे. जर हा व्हेरिएंट एखाद्या कम्युनिटमध्ये पसरत असेल तर त्यासाठी कम्युनिटी टेस्टिंग व्हायला हवी.

पीसीआर चाचणीमध्ये, S gene target failure (SGTF) omicron सूचित करू शकते, जेणेकरून नवीन व्हेरिएंट सहज शोधता येईल. कोविड-19 लसीकरण जेवढ्या प्रमाणात वाढवता येईल तेवढी त्याची तीव्रता वाढवा. विशेषतः ज्या लोकांचे लसीकरण झालेले नाही किंवा पूर्ण लसीकरण झालेले नाही अशा लोकसंख्येवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासादरम्यान जोखमीकडे दुर्लक्ष करू नका.

या गोष्टीही ठेवा लक्षात

याशिवाय काही खास गोष्टीही लक्षात ठेवायला हव्यात. मास्क घालणं आणि शारीरिक अंतर ठेवणं. घर किंवा ऑफिसमध्ये पुरेसं व्हेंटिलेशन असणं महत्त्वाचं आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. ओमिक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग हा हात धुवून देखील टाळता येऊ शकतो. व्हायरसच्या संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी, अलीकडे संपर्कात आलेल्या लोकांना शोधणे आवश्यक आहे.

कोरोनाची संभाव्य लाट लक्षात घेऊन आपल्याकडे आरोग्य सेवा प्रणालींकडे पुरेशी संसाधने आहेत याची खात्री करा. याव्यतिरिक्त, आरोग्य अधिकाऱ्यांनी वेळोवेळी ओमिक्रॉन किंवा स्प्रेडिंग व्हेरियंटशी संबंधित योग्य माहिती लोकांपर्यंत पोहचवली पाहिजे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT